Join us

डॉ.जब्बार पटेल सांगतात, पूर्वीचे चित्रपट मनाला सहज भिडायचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 10:47 IST

 सध्या मराठी चित्रपटसृष्टी यशाच्या उंच शिखरावर पोहोचली आहे. या चित्रपटसृष्टीत अनेक आगामी चित्रपट येऊ घालत आहे. मात्र ज्येष्ठ दिग्दर्शक ...

 सध्या मराठी चित्रपटसृष्टी यशाच्या उंच शिखरावर पोहोचली आहे. या चित्रपटसृष्टीत अनेक आगामी चित्रपट येऊ घालत आहे. मात्र ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल सांगतात, जुने चित्रपट कृष्णधवल चित्रफितीद्वारे दाखविले जात. तरीदेखील त्यातील बारकावे प्रेक्षकांच्या मनाला सहज जिंकून घेत असत. चित्रीकरणासाठी प्रगतशील साधनांचा अभाव असतानाही निर्मिलेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. सध्या आधुनिक तंत्रज्ञान, कॅमेºयांचे विविध प्रकार वापरूनदेखील आजचे चित्रपट मनाला पटत नसल्याची खंत त्यांनी एक कार्यक्रमात व्यक्त केली. तसेच समाजाचे प्रतिबिंब दाखविणारे माध्यम म्हणून चित्रपटांकडे पाहायले जाते. चित्रपट हे समाजाचे प्रबोधन करणारे माध्यम म्हणून पाहायले जाते. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात चित्रीकरणाची साधने सहजतेने वापरणे शक्य असले तरी, पूर्वीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. चित्रपटासाठी दिग्दर्शकाला संपूर्ण तांत्रिक गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कमीत कमी संवाद, संगीत आणि मुद्राभिनयाद्वारे  प्रेक्षकांना चटकन उमगते. तसेच  या कार्यक्रमावेळी मराठा रीसर्च जर्नलच्या सिनेमा अ कॅलिडोस्कोपिक व्हयू या शोधनिबंधाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. तर डॉ. मोहन आगाशे म्हणाले, माध्यमांमध्ये टिकण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. चित्रपटातील एखाद्या व्यक्तिरेखा साकारताना अतिशयोक्तपणाऐवजी नैसर्गिक अभिनयाची कास धरली पाहिजे.  डॉ. जब्बार पटेल यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक होता विदूषक, उंबरठा, जैत रे जैत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पथिक, मुक्ता, सिंहासन, मुसाफिर, सामना असे अनेक चित्रपट दिले आहेत. तर तुझ आहे तुझपाशी, माणूस नावाचे बोट यासांरख्या नाटकांमध्येदेखील त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली.