Join us  

तू आमच्या समोर नसणार पण पाठीशी असणार म्हणत डॉ. गिरिश ओक यांनी आईसाठी लिहिली ही कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:53 PM

डॉ. गिरिश ओक यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांनी आईसाठी लिहिलेली कविता वाचून तुमच्या डोळ्यांत नक्कीच पाणी येईल.

ठळक मुद्दे"आई" तू आमच्या समोर नसणार आहेस पण आमच्या पाठीशी असणार आहेस माहितीये आम्हाला.

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते डॉ.गिरिश ओक यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाविषयी गिरिश ओक यांनीच एक पोस्ट लिहून सांगितले आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"सौ शशीकला रत्नाकर ओक" माझी आई जन्म २२ सप्टेंबर १९३७ परवाच २१ मार्च २०२१ ला मला आत्मनिर्भर करून गेली आणि कधीतरी कोणाचं...

Posted by Dr. Girish Oak on Monday, March 22, 2021

गिरिश ओक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,   "सौ शशीकला रत्नाकर ओक"माझी आई जन्म २२ सप्टेंबर १९३७ परवाच २१ मार्च २०२१ ला मला आत्मनिर्भर करून गेली आणि कधीतरी कोणाचं तरी सांत्वन करण्यासाठी मीच केलेली ही कविता माझंच सांत्वन करायला धावून आली आणि माझ्यात सकारात्मकता भरून गेली."इथला धीर पुरेनासा होतोइथलं औषध लागेनासं होतंइथली हवा मानवेनाशी होतेमग जगण्याची इच्छाच नाहीशी होतेबट डोन्ट से द पेशंट ईझ डेडबट द पेशंट ईझ ट्रान्सफर्ड टू सूपर आय सी यूतिथला धीर खोटा खोटा नसतोअमृत फार्मास्युटिकल्सच्या औषधांमधे भेसळ नसतेअहो क्वॅालिटी कंट्रोल बोर्डावर चक्क अश्विनी कुमार बसलेले असतात नं !आणि हवं नको ते बघायला मुलं नातवंडं नाही तर चक्क आई बाबा आजी आजोबा खापर खापर सगळेचतिथल्या हवेत पोल्यूशन नसतंसगळंच कसं इथल्या पेक्षा अपग्रेडेड असतंतिथे जगण्यासाठी शरीराची गरजच नसतेमग ते थकलं काय नी नसलं कायफक्त इथल्या आय सी यू च्या दाराच्या काचेतून तुम्ही पेशंटला बघू शकतात हेल्पलेसपणेती सोय (?) सूपर आय सी यू ला नाहीपण काळजी करू नकाकेस आताखुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात आहेसो डोन्ट वरी "---------------------------"आई" तू आमच्या समोर नसणार आहेस पण आमच्या पाठीशी असणार आहेस माहितीये आम्हाला.

टॅग्स :गिरिश ओक