डॉ. श्रीराम लागू यांना ' पिंजरा' पुष्पगुच्छ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 14:30 IST
रसिकांच्या मनावर गेली चार दशके ' पिंजरा ' या चित्रपटाने आधिराज्य केले आहे. डॉ. श्रीराम लागू , निळू फुले, ...
डॉ. श्रीराम लागू यांना ' पिंजरा' पुष्पगुच्छ
रसिकांच्या मनावर गेली चार दशके ' पिंजरा ' या चित्रपटाने आधिराज्य केले आहे. डॉ. श्रीराम लागू , निळू फुले, संध्या यांच्या अभिजात कलागुणांनी नटलेली अजरामर कलाकृती म्हणजे ' पिंजरा '! डॉ. श्रीराम लागू यांच्या अभियानाने नवे मापदंड निर्माण झाले. नुकतेच हा चित्रपट डिजिटल तंत्रज्ञानाने रसिकांच्या पुन्हा भेटीला आला आहे. लहानपणापासून वेगवेगळ्या वयात सुमारे ७ ते ८वेळा हा चित्रपट एकपात्री कलाकार राहुल भालेराव यांनी पाहिला. प्रत्येक वेळी नवीन अनुभूती या चित्रपटाने दिली. भावभावनांच्या विविध रंगात रंगविणाºया डॉ. श्रीराम लागू यांना ' होळी व रंगपंचमीनिमित्त' अभिनव असा 'पिंजरा पुष्पगुच्छ' तयार करून देण्याची कल्पना भालेराव यांच्या मनात आली. त्यांनी त्यांची ही कल्पना प्रत्यक्षात देखील उतरविली. हास्यकलाकार राहुल भालेराव, मकरंद टिल्लू यांनी तयार केलेला हा अभिनव पुष्पगुच्छ पाहून डॉ. लागू व दीपा श्रीराम हे हरखून गेले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि गप्पा रंगल्या. रसिकांचे निर्व्याज प्रेम हे मनाला उभारी देणारे असते अशी भावना देखील डॉ.श्रीराम लागू यांनी व्यक्त केली.