Join us  

फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, मराठी सिनेसृष्टीवर आज करतेय राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 7:00 AM

फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत का?, तिने कमी कालावधीत आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्यानं रसिकांना भुरळ पाडली आहे.

कलाकार आणि त्यांचे चाहते यांचे नाते काही आगळेवेगळे असते. चाहत्यांना कलाकारांच्या खासगी तसेच प्रोफेशनल लाइफबद्दल जाणून घ्यायची खूप उत्सुकता असते. कलाकार बऱ्याचदा चाहत्यांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. तसेच सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने देखील नुकताच तिच्या सिनेमाचा उल्लेख करत बालपणीचा फोटो शेअर केला आहे. 

सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामवर तमाशा लाइव्ह चित्रपटातील काही फोटो शेअर केले आहेत. तसेच तिच्या बालपणीचाही फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, तमाशा लाइव्ह हा संजय जाधव यांचा म्युझिकल चित्रपट करण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्ताने भारतीय लोकनृत्याचे वेगवेगळे प्रकार सिनेमात करायला मिळाले आणि ही सगळी गाणी कथानक पुढे नेतात. भांगडा हे गाणं एका नवीन पात्राची ओळख करून देतं …अस्खलित मराठीत क्षितीज पटवर्धनने हा भांगडा लिहिलाय. अमितराज यांचं संगीत, वैशाली सामंत यांनी गायलंय आणि उमेश जाधव यांचं नृत्य दिग्दर्शन आहे.

सोनाली पुढे लिहिले की, मी लहानपणी शाळेच्या स्नेह संमेलनात “भांगडा” केला होता त्यानंतर आता. सोनालीच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.  सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची तमाशा लाइव्हमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर आता लवकरच ती 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी