Join us  

अतुल कुलकर्णी रात्रीच्या जेवणाची ही वेळ कधीच चुकवत नाहीत,फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 4:01 PM

गाडीतच मागच्या बाजूला बसून त्यांनी जेवणावर ताव मारला. जेवण करतानाचा हाच फोटो खुद्द अतुल कुलकर्णीने ट्विटरवर शेअर केला आहे.

कलाकार मंडळींचं शेड्युअल खूप बिझी असतं. शुटिंगच्या गडबडीत खाण्या पिण्याचं या कलाकाराचं शेड्युअलही बिघडतं. मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही मंडळी शुटिंगच्या सेटवरच सहकाऱ्यांसह नाश्ता, जेवण उरकून घेतात. जर सेटवर वेळ मिळालाच नाही तर घरी किंवा बाहेर हॉटेलमध्ये खाण्याशिवाय या कलाकारांकडे पर्याय नसतो. मात्र या सगळ्या धावपळीत जेवणाच वेळापत्रक बिघडतं. काही कलाकार मात्र याला अपवाद ठरतात. कितीही बिझी आणि टाईट शुटिंग शेड्युअल असलं तरी हे कलाकार आपल्या जेवणाची वेळ अजिबात चुकू देत नाहीत. असाच एक कलाकार म्हणजे अभिनेता अतुल कुलकर्णी.

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यामुळेच अतुल कुलकर्णीचं शुटिंगचं शेड्युअल टाइट असतं. मात्र कितीही बिझी असले तरी अतुल कुलकर्णी आपल्या जेवणाची वेळ चुकवत नाहीत. नुकतंच एका सिनेमाच्या शुटिंगसाठी ओडिशा इथे जात होते. प्रवासादरम्यान त्यांच्या रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती.

ही वेळ होती संध्याकाळी ६.३० वाजता. हो तुम्ही बरोबर वाचलं आहे. कारण अतुल कुलकर्णी कुठेही जात असले तरी रात्रीच्या जेवणाची ही आपली नेहमीची वेळ कधीच चुकवत नाही. मग काय ओडिशाच्या प्रवासात वाटेत संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. गाडीतच मागच्या बाजूला बसून त्यांनी जेवणावर ताव मारला. जेवण करतानाचा हाच फोटो खुद्द अतुल कुलकर्णीने ट्विटरवर शेअर केला आहे.

या फोटोवर त्यांच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. फॅन्सनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुठेही असलो तरी संध्या. ६.३० वा. ही रात्रीच्या जेवणाची वेळ चुकवत नसल्याचं अतुल कुलकर्णीने स्पष्ट केले आहे. 

अतुल कुलकर्णी कंगना राणौवतच्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' चित्रपट दिसणार आहे. यात तो  तात्याराव टोपेंच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातून सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अकिंता लोखंडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. यात ती झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहे.

झलकारी बाई या राणी लक्ष्मीबाईंच्या खास व्यक्तिंपैकी एक होत्या. इतिहासात इलकारीबार्इंचे अनन्यासाधारण स्थान आहे.. झलकारी बाईंने इंग्रजांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. युद्धात राणी लक्ष्मीबाई यांच्या जागी झलकारी बाई यांना ठेवण्यात आले होते. झलकारी बाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईंच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. 

टॅग्स :अतुल कुलकर्णी