Join us  

या फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?, ३६ वर्षांपूर्वी त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आणि चित्रपट आजही आहेत लोकप्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 4:21 PM

३६ वर्षांपूर्वी या अभिनेत्रीवर चित्रित झालेली गाणी आणि चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. या अभिनेत्रीला आता ओळखणं कठीण झालं आहे.

ऐंशी व नव्वदच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक दमदार सिनेमे प्रदर्शित झाले होते. हे चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. या फोटोतील या अभिनेत्रीला कदाचित तुम्ही ओळखलं नसेल. पण या अभिनेत्रीने केलेले काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. १९८४ साली हेच माझं माहेर हा चित्रपट रिलीज झाला होता. ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा…., कळले काही तुला…. कळले काही मला.. अशी श्रवणीय गाणी या चित्रपटाला लाभली होती. सुलभा देशपांडे, मधू कांबीकर, रविंद्र महाजनी, अशोक सराफ, रंजना, मोहन गोखले, शर्मिला मेढेकर हे कलाकार या सिनेमात होते. या फोटोतील या अभिनेत्रीचे नाव आहे शर्मिला मेढेकर.हेच माझं माहेर या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ३६ वर्षे उलटली आहेत. ये अबोली लाज गाली..आणि कळले काही तुला…ही गाणी मोहन गोखले आणि शर्मिला मेढेकर यांच्यावर चित्रित झाली होती. शर्मिला  यांनी हेच माझं माहेर चित्रपटाव्यतिरिक्त ‘घाबरायचं नाही’ हा मराठी चित्रपट आणि ‘सोम मंगल शनी’ (१९८८) या हिंदी चित्रपटात काम केले होते.

शर्मिला मेढेकर यांनी प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते सतीश कुलकर्णी यांच्याशी लग्न केले. सतीश कुलकर्णी यांनी ‘श्री तुलसी प्रॉडक्शन’ ही निर्मिती संस्था सुरू केली यातून अनेक हिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे.

एका पेक्षा एक, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत, जमलं हो जमलं, लपून छपून अशा अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली असून विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आले आहे.

शर्मिला मेढेकर कुलकर्णी बऱ्याच कालावधीपासून मराठी चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत.

टॅग्स :कविता लाड