Join us  

सईने अशा पद्धतीने दिल्या फॅन्सना दिवाळीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:55 PM

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते.  सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. नेहमी हॉट आणि बोल्ड फोटा शेअर करणाऱ्या सईने यावेळी मात्र साडीतले फोटो टाकून सगळ्यांना क्लीन बोल्ड केले आहे.  या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे. सईचे हे फोटोशूट पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडले. साडी सईच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. तिच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे.  सईने आपल्या फॅन्सना साडीतले फोटो शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच वैभव तत्त्वादीसोबत 'पाँडेचेरी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत.

या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकर