Join us  

सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय आणि राजकीय नेते..., केदार शिंदेची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 10:39 AM

आपल्या या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देकेदार शिंदे यांनी अगं बाई अरेच्चा, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, गलगले निघाले,  बकुळा नामदेव घोटाळे, इरादा पक्का  अशा विविध मराठी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

कोरोनामुळे राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. कोरोना रूग्णांची संख्या कमी झालेली असली तरी संकट संपलेले नाही. अशात सणवार, उत्सव साधेपणाने साजरे करून जनतेचे प्राण वाचविण्याला प्राधान्य द्या, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडीला परवानगी नाकारली. भाजप व मनसेने मात्र याला जोरदार विरोध केला. केवळ विरोध नाही तर ठाणे आणि मुंबईत दहीहंडी धडाक्यात साजरी होईल, असे ठणकावून सांगितले. इतकेच नाही तर सर्व निर्बंध झुगारून मनसेने ठाणे, मुंबईत रात्री पहाटेच्या सुमारास मानवी मनोरे उभारत दहीहंडी फोडली.याच पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक-लेखक-निर्माता केदार शिंदे ( Kedar Shinde) यांची पोस्ट सध्या व्हायरल होतेय. आपल्या या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. (director kedar shinde tweet on dahi handi festival goes viral)

केदार शिंदेंची पोस्ट व्हायरलकाल रात्री केदार शिंदे यांनी एक ट्वीट केले. ‘राजकीय नेते एकमेकांच्या हंड्या फोडण्याच्या कार्यक्रमात मग्न आहेत. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे. गेल्या दोन वर्षांत सामान्यांच्या जीवनाचा दहीकाला झालाय, याकडे कुणाचही लक्ष नाही’, असे त्यांनी आपल्या या ट्वीटमध्ये लिहिले.

 केदार शिंदेंच्या या ट्वीटवर नेटकºयांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या या ट्वीटचे समर्थन केले आहे.

केदार शिंदे यांनी अगं बाई अरेच्चा, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, गलगले निघाले,  बकुळा नामदेव घोटाळे, इरादा पक्का  अशा विविध मराठी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. याशिवाय रंगभूमीवरही केदार यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत.  सही रे सही,  लोचा झाला रे, श्रीमंत दामोदरपंत  अशा त्यांच्या अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल. याशिवाय हसा चकट फू, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय या मालिकांमधून त्यांनी छोट्या पडद्यावरही ओळख निर्माण केली आहे.

 

टॅग्स :केदार शिंदेदहीहंडी