Join us

दिग्दर्शक दासबाबू यांचा ब्रेव्हहार्ट प्रदर्शनासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 11:08 IST

ज्येष्ठ दिग्दर्शक दासबाबू हे लवकरच प्रेक्षकांसाठी एक आगामी चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव ब्रेव्हहार्ट असे आहे. या ...

ज्येष्ठ दिग्दर्शक दासबाबू हे लवकरच प्रेक्षकांसाठी एक आगामी चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे नाव ब्रेव्हहार्ट असे आहे. या चित्रपटाचे विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अनेक चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटाचे खास कौतुकदेखील करण्यात आले आहे. या चित्रपटात कलाकार कोण असणार आहे हे अदयापदेखील कळाले नाही. मात्र हा चित्रपट आता, प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तसेच या चित्रपटाची निर्माते सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस व संतोष यशवंत मोकाशी हे आहेत. मात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक दासबाबू यांनी यापूर्वी लढा, श्रीमंताची लेक, हे बंध रेशमाचे, वाजवा रे वाजवा आई, फक्त तुज्याचसाठी, एक धागा सुखाचा, मित्रा याला जीवन ऐसे नाव यासारखे अनेक मालिकांचे दिग्दर्शन केले आहेत. त्यांच्या या मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहे. त्याचबरोबर तहान  या चित्रपटाचेदेखील दिग्दर्शन केले आहे. नुकतेच दासबाबू यांचे  मुंबई विदयापीठाच्या हिंदी विषयाचा सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. हिंदी विभाग पाठ्यक्रम समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सभेत त्याविषयीचा ठराव संमत करण्यात आला. त्यानुसार तृतीय वर्ष हिंदी विषयाचा सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये ज्येष्ठ अनुभवी दिग्दर्शक दासबाबू यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे दिग्दर्शनाबरोबर आता ते आणखी एक जबाबदारी पार पाडणार आहेत.  मुंबई विदयापीठाने दाखविलेला हा विश्वास नक्कीच मी जबाबदारीने पूर्णत्वास नेईन, असा विश्वास दिग्दर्शक दासबाबू यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.