दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशीने असे केले वाढदिवसाचे सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 14:44 IST
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या ...
दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशीने असे केले वाढदिवसाचे सेलिब्रेशन
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला या मालिकेने एक वेगळी ओळख मिळवून दिली. सुव्रत जोशी हे नाव याच मालिकेमुळे प्रसिद्ध झाले. या मालिकेनंतर तो आता दिल दोस्ती दोबारा या मालिकेतदेखील झळकत आहे. दिल दोस्ती दोबारा ही मालिका दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचाच दुसरा सिझन आहे. या मालिकेसोबतच सध्या तो अमर फोटो स्टुडिओ या नाटकात आपल्याला पाहायला मिळत आहे. सुव्रतचा नुकताच वाढदिवस झाला. त्याने त्याचा हा वाढदिवस खूपच वेगळ्याप्रकारे साजरा केला.वाढदिवस म्हटले की प्रत्येकाचे वाढदिवसाचे प्लान हे कित्येक महिने आधीपासून ठरलेले असतात. मित्रमैत्रिणींसोबत फिरायला कुठे जायचे. त्यानंतर कुठे जेवायचे हे सगळेच ठरलेले असते. वाढदिवसाच्या दिवशी काम करण्यापेक्षा सुट्टी घेऊन तो दिवस चांगला एन्जॉय केला जातो. वाढदिवस हा आयुष्यातील स्पेशल दिवस असल्याने तो प्रत्येकजण खास बनवण्याचा प्रयत्न करत असतो.सुव्रतनेदेखील वाढदिवसाला अशीच काहीशी मजा-मस्ती केली असेल असेच तुम्हाला वाटत असेल ना... पण असे काहीच नाही. सुव्रतने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी न घेता काम केले. त्याने एकाच दिवशी अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे दोन प्रयोग केले आणि त्याच्याविषयी त्याने त्याच्या फॅन्सना फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. त्याने फेसबुकला पोस्ट करून म्हटले आहे की, तुम्हाला आयुष्यात सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडते, ती वाढदिवसाच्या दिवशी केली तर तुमचा वाढदिवस खूपच चांगल्याप्रकारे साजरा होतो असे मला वाटते. त्यामुळे मी अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे माझ्या वाढदिवशी दोन प्रयोग करत आहे.