Join us  

ते फक्त ६०० होते..... जंगजौहर सिनेमाचा नवीन लूक आला समोर, सिनेमातून उलडगणार बलिदानाची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 11:36 AM

‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या प्रारंभी ‘जंगजौहर’ ची पहिली झलक दिसल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.

मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे हे आपले कर्तव्य आहे. ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक ठेवा यशस्वीपणे पोहचविल्यांतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटातून आणखी एका अजोड पराक्रमाची गाथा जून २०२० मध्ये मराठी रुपेरी पडद्यावर साकारणार आहेत. तुर्तास या सिनेमाचा नवीन लूक समोर आला आहे. हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल असून या फोटोवर शिवप्रेमांचा वर्षाव सुरू आहे.

अनेक ऐतिहासिक मूळ कागदपत्रे व ऐतिहासिक ग्रंथाच्या संशोधनातून हा चित्रपट साकारला जाणार आहे. या चित्रपटाच्या संशोधनासाठी वेगवेगळ्या तत्कालीन घराण्यांच्या वंशजाकडून अधिकृत कागदपत्रांची मदत झाली आहे. ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटाच्या प्रारंभी ‘जंगजौहर’ ची पहिली झलक दिसल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. 

आता ‘आलमंड्स क्रिएशन्स’चे अजय-अनिरुद्ध आरेकर यांनी ‘जंगजौहर’ चित्रपटाच्या निर्मितीची अधिकृत घोषणा केली आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या अतुलनीय पराक्रमाची ‘जंगजौहर’ मधून उलगडणारी बलिदानगाथा प्रत्येकासाठी स्फूर्तीदायक असेल. 

टॅग्स :दिग्पाल लांजेकर