Join us  

अलका कुबलच्या मुलींना पाहिलंत का?, अभिनय क्षेत्राऐवजी या क्षेत्रात आहेत कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 6:00 AM

अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना दोन मुली आहेत एकीचे नाव आहे ईशानी तर दुसरीचे नाव आहे कस्तुरी. या दोघी सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना दोन मुली आहेत एकीचे नाव आहे ईशानी तर दुसरीचे नाव  आहे कस्तुरी. या दोघी सिनेइंडस्ट्रीऐवजी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. 

अलका कुबल- आठल्ये आणि समीर आठल्ये यांची लेक ईशानी वैमानिक आहे. तिच्यामध्ये लहानपणापासूनच जिद्द होती की, आपण काहीतरी वेगळे करायचे जे केल्याने तिची समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होईल. त्यामुळे तिने आईच्या पावलावर पाऊल न ठेवता आणि अभिनयाचे क्षेत्र न निवडता वैमानिक बनायचा निश्चय केला.

ईशानीला लहानपणापासूनच विमानाच्या बाबतीत अधिक माहिती करून घेण्याची खूप आवड होती. या आवडीनेच तिला तिच्या पुढच्या येणाऱ्या भवितव्यासाठी शिक्षण घेण्यास प्रेरणा दिली. इशानीने वैमानिक बनण्यासाठी खूप मेहनत घेतली.

तिने शिक्षण घेत असताना खूप अभ्यास केला मेहनत घेतली आणि तिने घेतलेल्या मेहनतीचे फळही तिला चांगलेच भेटले.

त्यानंतर तिला व्यावसायिक विमान चालवण्यासाठी लायसेन्स देखील भेटले आहे. म्हणजे आता ती व्यावसायिक विमानाची पायलट म्हणून विमान चालवण्यास सक्षम झाली आहे.

या क्षेत्रात तिने चांगल्या प्रकारे नैपुण्य मिळवून आई वडिलांचे देखील नाव रोशन केले आहे. ईशानीचे दिल्लीतील निशांत वालियासोबत लग्न झाले आहे.

अलका कुबल यांची धाकटी लेक कस्तुरी परदेशात डर्मेटोलॉजिस्टचे शिक्षण घेत आहे.

टॅग्स :अलका कुबल