Join us  

स्पृहा जोशीचा हा अंदाज तुम्ही पाहिला आहे?, मेकअपविनाही खुलले सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 11:15 AM

सध्या स्पृहा एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमाची निर्मिती संजय दत्त करत आहे. 

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत.'मोरया', पैसा पैसा यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने जादू दाखवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. नुकताच स्पृहाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. काळी रंगछटा असलेल्या फोटोमध्ये स्पृहा विचारात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे. स्पृहाचा हा फोटो मेकअपविना असून निवांत क्षणाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. सध्या स्पृहा एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमाची निर्मिती संजय दत्त करत आहे. 

अभिनयासोबतच स्पृहा लेखिका व उत्तम कवियत्री आहे. छोट्या पडद्यावरील बच्चे कंपनीच्या रिएलिटी शोचे सूत्रसंचालन करून तिने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मने जिंकली आहेत. नुकतेच स्पृहाने २०१८ वर्षाला निरोप देत त्यावर्षी आलेल्या कटू-गोड आठवणींचा उल्लेख करत एक प्रेररणादायी पोस्ट स्पृहाने आपल्या सोशल अकाऊंटवरुन शेअर केली  होती.  यासोबतच पोस्टमधून तिने खंतदेखील व्यक्त केली  होती.

स्पृहा जोशीने या वर्षात आलेले अनेक अनुभव तिने खुद्द चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. कधी शारिरीक टिप्पणी तर कधी ती प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरवल्याने अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी तिला काम नाकारले होते. आपण सगळ्यांशी मनापासून प्रेमाने वागूनही आपल्याला पाण्यात पाहणारे इतके लोक आहेत याचे खूप दुःख स्पृहाला झाले. पण मग एका पॉईंटला तिचे डोळे खडखडून उघडले. तिने आता नवीन वर्षात या सर्व आव्हानांवर मात करत कठोर परिश्रमाच्या जोरावर सामोरे जायचे ठरवले आहे. 

टॅग्स :स्पृहा जोशी