प्रदर्शित पूर्वीच 'ध्यानीमनी' हिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 15:44 IST
सध्या ध्यानीमनी या चित्रपटाची चर्चा रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. सोशलमीडियावर या चित्रपटाने तर धुमाकूळ घातलेला दिसत आहे. प्रेक्षकांसहित ...
प्रदर्शित पूर्वीच 'ध्यानीमनी' हिट
सध्या ध्यानीमनी या चित्रपटाची चर्चा रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. सोशलमीडियावर या चित्रपटाने तर धुमाकूळ घातलेला दिसत आहे. प्रेक्षकांसहित बॉलिवुड आणि मराठी कलाकारदेखील या चित्रपटाच्या प्रेमात पडले असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, काही चित्रपट चोरपावलांनी येतात आणि ठसा उमटवून जातात फक्त तिकिटावरच नाही, तर मनावर सुद्धा ! चित्रपट हे असे माध्यम आहे जिथे अलीकडच्या काळात चित्रपटांच्या कथांचे विषयच नाही तर त्यांच्या प्रसार पद्धती देखील बदलत चाललेल्या दिसून येतात. नेहमीच काहीतरी नाविन्य असलेल्या कथा घेऊन येणारे महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बघू नका अशी विनंती अनेक दिग्गज कलाकार करत आहेत. कलाकारांच्या अशा आग्रही विनवण्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. ठाम, गंभीर आणि रहस्यमय अशा प्रकारच्या भावना त्यांच्या चेहºयावर व्हिडिओत व्यक्त होताना आढळून येत आहेत. एकीकडे काळ बदलत चाललेला असताना मराठी चित्रपट नव्या भरारी घेताना आपण बघतो आहोत. हा चित्रपटबद्दल ख्यातनाम हिंदी सिनेतारे, अमिताभ बच्चन व सलमान खान यांनी सुद्धा हा चित्रपट बघू नका असे ट्विट द्वारे केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील सचिन खेडेकर, भाऊ कदम, अमृता खानविलकर, संजय जाधव, संदीप पाठक, आनंद इंगळे, संस्कृती बालगुडे,वैदेही परशुरामी, आकाश ठोसर तसेच पूजा सावंत हे देखील चित्रपट बघू नका असे आग्रहाने सांगत आहेत. साधारणत: कलाकार एकमेकांच्या सिनेमांचे प्रसिद्धीकरण करताना दिसून येते. पण या चित्रपटा बाबत तसे नसून, तो बघू नका!असे सर्वजण सांगत असल्याने चित्रपटाप्रतीच्या या नकारात्मक भूमिकेने अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. कोणत्याही प्रकारचे रक्षा कवच न बाळगता जोखमीने केल्या गेलेल्या या चित्रपटाचे असे प्रसिद्धीकरण हे वेगळच आहे.माणसाचा स्वभावच असतो की एखादी गोष्ट करू नका किंवा बघू नका सांगितल्यावर ती मुद्दाम करावीशीच वाटते. निर्मात्यांना त्यांच्या कलाकृती विषयी असलेला आत्मविश्वास तसेच त्यांनी केलेले धाडस यातून दिसून येते. हे सांगताना प्रेक्षकांची निराशा होणार नाही अशी खात्री त्यांच्या सांगण्यात दिसून येते. चित्रपटाविषयी आता प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.