Join us  

राणादाच्या वहिनीचा स्वॅग लूक व्हायरल, ओळखलंत का कोण आहे ही अभिनेत्री ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:20 AM

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनीने तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनंही रसिकांना भुरळ पाडली आहे.

तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगावकरला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिने या मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनंही रसिकांना भुरळ पाडली आहे. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेतच पण धनश्री म्हणजेच नंदिता वहिनीदेखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 

धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते. मालिकेत साडी व पारंपारिक वेशात दिसली असली तरी ती खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस व बोल्ड आहे. तिचा हा अंदाज सोशल मीडियावर पहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी तिने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूप ग्लॅमरस व बोल्ड दिसते आहे.

या फोटोत धनश्री एका खुर्चीत बसलेली दिसतेय. या फोटोत ती खूपच हॉट दिसतेय आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत असल्याचं पहायला मिळत आहेत. 

धनश्री सध्या फिटनेस फ्रीक झाल्याचेदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतेय. सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ ती शेअर करत असते. 

टॅग्स :धनश्री काडगावकरझी मराठीतुझ्यात जीव रंगला