Join us  

धनश्री काडगावकरचे नवीन मॅटर्निटी फोटोशूट आले समोर, बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 10:40 AM

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत धनश्री काम करत नसली तरीही तिची कमी रसिकांना नक्कीच जाणवते. त्यामुळे आजही धनश्रीच्या रूपातील नंदिता वहिनीला चाहते विसरलेले नाहीत.

2020 हे वर्ष काही  सेलिब्रिटी कपलसाठी खास ठरले आहे. गरोदर असल्याची गुड न्युज शेअर करत सेलिब्रेटींनी आपला आनंद चाहत्यांसह व्यक्त केला. त्यानंतर एक से बढकर एक मॅटर्निटी फोटोशूटही करत लक्ष वेधून घेत आहेत. मराठमोळी धनश्री काडगावकरनं  खास व्हिडिओ शेअर करत तिची गुड न्युज शेअर केली. धनश्री सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. 

तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची गोष्टही तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली होती.  कर कुणीतरी येणार येणार गं ... असं म्हणत ही गोष्ट शेअर करण्यासाठी पतीच्या वाढदिवसाच्याच दिवशी तिने तिची गुड न्युज शेअर करताच चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. सध्या धनश्री तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. इतरांप्रमाणे तिनेही मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.  तिने परिधान केलेला ड्रेसही तितकाच आकर्षक असा आहे.

 या फोटोशूटमधील निवडक फोटो तिने शेअर केले आहे .या फोटोंनाही चाहते लाकईक्स आणि कमेंटस देत असल्याचे पाहायला मिळतंय. प्रेग्नंसीमुळे तिच्या चेह-यावर कमालीचे तेज आल्याचे पाहायला मिळत आहे. बाळाच्या आगमनाची हे कुटुंबीय आतुरतेने वाट पाहात आहेत. कुटुंबातही आनंदाचे वातावरण आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले. हे अरेंज्ड मॅरेज होते. 

ख-या अर्थाने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत धनश्रीने साकारलेल्या नंदिता वहिनीची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती  मालिकेत तिचा अस्सल ग्रामीण ठसका बघायला मिळाला होता. भूमिकेला ग्रे शेड होते तरी धनश्रीने ही भूमिका वेगळ्या उंचीवर नेली होती. नंदिताची

भूमिका राणा-अंजलीच्या प्रेमकहाणीत तडक्याचे काम करत होती त्यामुळे तितकाच राग आणणा-या पण रंजक असे पात्र तिने साकारले होते. आता धनश्री मालिकेत काम करत नसली तरीही तिची कमी रसिकांना नक्कीच जाणवते. त्यामुळे आजही धनश्रीच्या रूपातील नंदिता वहिनीला चाहते विसरलेले नाहीत.

टॅग्स :धनश्री काडगावकर