Join us

​‘डान्स हेच माझे पॅशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 14:55 IST

  priyanka londhe      तिच्या सौंदर्याने अनेकांना मोहित केले. तिच्या कातिलाना अदांजाने अनेकांना घायाळ केले...तिच्या नृत्याने अनेकांना ...

  priyanka londhe      तिच्या सौंदर्याने अनेकांना मोहित केले. तिच्या कातिलाना अदांजाने अनेकांना घायाळ केले...तिच्या नृत्याने अनेकांना वेड लावले... आम्ही बोलतोय, ते मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्याबद्दल. ‘मला जाऊं द्या ना घरी,आता वाजले की बारा...’ या अमृताच्या लावणीने आणि त्यातील तिच्या दिलखेच अदांनी साºयांना वेडे केले. डान्स म्हणजेच ‘सबकुछ’ मानणारी अमृता खानविलकर आता परिक्षकाच्या भूमिकेत तुम्हा-आम्हाला पाहायला मिळणार आहे.  ‘मॅड २’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोचे परिक्षण करताना ती दिसणार आहे. याविषयी अमृताने लोकमत सीएनएक्सशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा... तू पहिल्यांदाच डान्स शोचे परिक्षण करणार आहेस, याबद्दल काय सांगशील?-: माझे आणि नृत्याचे फार वेगळे नाते राहिले आहे. मला मनापासून डान्स करायला  आवडतो. डान्स हे माझे पॅशन आहे. याच पॅशनमुळे ‘नच बलिये’मध्ये एक स्पर्धक म्हणून मी दिसली आणि याच पॅशमुळे एका डान्स शोची परिक्षक म्हणून मी दिसणार आहे.  या शोसाठी परिक्षक म्हणून मला विचारण्यात आले तेव्हा मी लगेचच होकार कळविला. डान्स फॉर्म आता फक्त क्लासिकल किंवा बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेले नाहीत तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहे. आपल्याकडे महाराष्ट्रातील कानाकोपºयांमध्ये डान्सिंग टॅलेन्ट आहे. त्यामुळे या शोसाठी परिक्षण करताना फारच मजा येणार आहे. परिक्षण करताना तू नक्की कोणत्या गोष्टींवर जास्त लक्ष देणार?-: माझ्यामते, मुलांमध्ये सर्वप्रथम पॅशन आणि जिद्द असायला हवी. तुम्ही डान्स शिकू शकता, तो आत्मसात करु शकता पण जोपर्यंत तुमच्यात पॅशन नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. डान्स हा मनापासूनच करायला हवा.  तुमच्यात जिद्द नसेल तर तुम्ही स्वत:ला झोकून देऊ शकत नाही. मी स्वत: डान्स शिकलेले नाही, परंतू माझ्यात नृत्याप्रती एक प्रकारची पॅशन आहे.  शोची जज म्हणून मी या मुलांमधली जिद्द शोधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. संजय जाधव आणि उमेश जाधव यांच्यासोबत तू या शोमध्ये दिसणार आहेस, त्याबद्दल काय सांगशील?-: संजय सरांसोबत तर मी अनेक वर्षांपासून काम करते आहे. उमेशसोबत पण मी बरेच काम केले आहे. आता एका वेगळ्या भूमिकेत आम्ही एकत्र येणार आहोत, तर ती धमाल आणि मजा बघण्यासारखीच असणार. संजय आणि उमेश हे दोघेही त्यांच्या क्षेत्रातील मातबगार आहेत. त्यामुळे या दोघांसोबत काम करताना नक्कीच खूप मजा येणार आहे. उमेशने अनेक वर्षे कोरिओग्रफी केली आहे. संजयचे काम देखील मोठे आहे. या दोघांसोबत काम करताना मलाही खूप शिकायला मिळणार आहे. रिअ‍ॅलिटी शोजमधून आऊट झाल्यानंतर मुले निराश होतात, त्यांना तू काय सांगशील?-: हे बघ, मी देखील रिअ‍ॅलिटी शोमध्ये हरले होते. पण कुठल्याही गोष्टीने खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभे राहण्याची गरज असते. आम्ही या प्लॅटफॉर्मवरून स्पर्धकांना एक ओळख मिळवून देऊ शकतो. परंतू पुढे काय करायचे हे शोमध्ये सहभागी झालेल्या त्या-त्या मुलांवर आणि  त्यांच्या पालकांवर अवलंबून असणार. एकदा अपयशी झालोत म्हणून घरी जाऊन बसायचे, असे नक्कीच चालणार नाही. तुमचे मार्ग तुम्हीच शोधले पाहिजेत, हेच मुलांच्या मनावर बिंबवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तुझा आवडता  कोरिओग्राफर आणि डान्सर कोण आहे?-: रेमो डिसुझा हा माझा अत्यंत आवडता कोरिओग्राफर आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटात त्याचा एक वेगळा डान्सफॉर्म पहायला मिळतो. त्याची नृत्य करण्याची स्टाईल मला फार आवडते  तर मायकल जॅक्सन हा माझा आॅल टाईम फेव्हरेट डान्सर आहे. मायकल सारखा डान्स कुणीच करु शकत नाही.