Join us

नगरसेवक एक नायक हा चित्रपट लवकरच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 16:10 IST

सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहताहेत. कोणाची सत्ता येणार? आणि कोण बाजी मारणार? यात चुरस पहायला मिळतेय. लोकशाही ही लोकहिताची ...

सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहताहेत. कोणाची सत्ता येणार? आणि कोण बाजी मारणार? यात चुरस पहायला मिळतेय. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधीशांच्या हिताची ठरते. तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो... तो म्हणजे नगरसेवक. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. याच धर्तीवर जश पिक्चर्स प्रस्तुत आगामी नगरसेवक एक नायक हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.               शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित नगरसेवक या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक कदम यांनी केले आहे.  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल, तत्पूर्वी चित्रपटातील गीतांच्या ध्वनिफितीचे शानदार प्रकाशन संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रपटातील कलाकार- तंत्रज्ञांच्या सोबत विजय पाटकर, सुशांत शेलार, हेमलता बाणे, विनोद कुमार बरई व चंद्रशेखर सांडवे हे देखील आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी  चित्रपटाच्या संगीतासोबतच डिजीटल पोस्टर व ट्रेलर लाँच ही करण्यात आले.                   झी म्युझिकने नगरसेवक चित्रपटाची ध्वनिफीत प्रकाशित केली आहे. यातील चार वेगळ्या शैलीतील गीते गीतकार बिपीन धायगुडे, अभिजित कुलकर्णी व विनायक येरापाल्ले यांनी लिहिली असून ती संगीतकार देव आशिष यांनी संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला व बेला शेंडे यांनी यातील प्रेमगीत गायले असून आनंद शिंदे व आदर्श शिंदे यांनी हळदी गीत गायले आहेत. शीर्षक गीत कविता निकम, राजा हसन व देव चौहान यांनी गायले असून कविता निकम व देव चौहान यांच्या आवाजात आयटम सॉंग ऐकायला मिळणार आहे.