Join us  

CoronaVirus: सोनाली कुलकर्णीचे आवाहन, कोरोनाला हरवण्यासाठी लोकांशी नाही विषाणूंशी लढा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 6:40 PM

सोनाली कुलकर्णीने कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती व त्यांच्या कुटुंबासोबत होत असलेल्या भेदभावाविरूद्ध आवाज उठविला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आजच्या कोविड-१९ सारख्या आपत्तीच्या काळात कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबासोबत होत असलेल्या भेदभावपूर्ण व्यवहारा विरुद्ध आवाज उठवला आहे. त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती व त्यांच्या परिवारासोबत कोणीही भेदभावपूर्ण व्यवहार करू नये अशी विनंती आणि आवाहन जनतेला केले आहे.कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींबरोबर होत असलेला भेदभाव रोखण्याच्या हेतूने अनेक स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन हा अनब्रँडेड व्हिडिओ बनवला आहे. हा  ७० सेकंदांचा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावा व तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. आपण हा व्हिडिओ आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावरुन प्रसारित करून कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती व  त्याच्या कुटुंबासोबत होत असणाऱ्या आणि होऊ शकणाऱ्या भेदभावपूर्ण व अन्यायकारक व्यवहाराला रोखण्यास मदत करू शकता.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लॉकडाउनमध्ये घरात कैद आहे. तरीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करताना दिसते. तसेच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कदेखील साधत असते.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीकोरोना वायरस बातम्या