Join us  

CoronaVirus : क्वारंटाईनमुळे या मराठी अभिनेत्रीची नवऱ्यासोबत झाली ताटातूट, करतेय खूप मिस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 1:01 PM

क्वारंटाईनमुळे ही मराठी अभिनेत्री नवऱ्यापासून दुरावली आहे

सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सा-यांना घरातच राहण्याची सरकारने आदेश दिले आहेत. अशात नेहमी बिझी असणारे सेलिब्रेटीही बंदिस्त घरात त्यांच्या घरातील काम करताना दिसत आहे. क्वारांटाईन झालेला कलाकार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत.

सध्या क्वारंटाईनमुळे प्रार्थना तिच्या माहेरी म्हणजेच वडोदरा येथे आहे. तिचा नवरा तिच्यासोबत नाही. त्यामुळे तिला त्याची आठवण येत आहे. खुद्द तिनेच इंस्टाग्रामवर त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत त्याला मिस यू म्हटलं आहे.

प्रार्थना बेहरे हिने नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा मी तुला मिस करते तेव्हा मी आपले जुने संभाषण वाचते. जुने फोटो पाहते. वेड्यासारखी हसते. गाणी ऐकते जी मला तुझी आठवण करून देतात. तेव्हा मी तुला आणखीन मिस करते. 

प्रार्थनाचे लग्न अभिषेक जावकरसोबत झाले आहे.अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. 

प्रार्थनाने याआधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.

टॅग्स :प्रार्थना बेहरेकोरोना वायरस बातम्या