Join us  

Corona Virus: कनिकानंतर या मराठी अभिनेत्रीलाही कोरोनाची लागण ? चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 3:21 PM

इतर सेलिब्रेटींप्रमाणे कोरोनापासून सावधगिरीच्या सुचना करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता.

कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्व लोक घरात बंद आहेत. लोक आपल्या बचावासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. ते स्वतःला स्वतःच्या घरात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान सेलिब्रेटी घरात राहून आपला वेळ व्यतित करत आहेत.अशातच आता दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त पेशंटची संख्या वाढत असताना अनेक धक्कादायक बाबीही या आजाराबाबत समोर येत आहेत. सध्या सर्वत्रच लॉकडाऊन असताना एका मराठी सेलिब्रेटीचा फोटो पाहून अनेकांनी तिलाही कोरोनाची लागण तर नाही ना झाली असे प्रश्न विचारून तिला पुरते हैराण केल्याचे पाहायला मिळत आहे. अत्रिज्ञा भावेचा एक फोटो तुफान व्हायरल झाला असून तिच्या या फोटोवर फक्त तिच्या तब्येतीबाबत चाहते विचारणा करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

अभिज्ञानेही इतर सेलिब्रेटींप्रमाणे कोरोनापासून सावधगिरीच्या सुचना करणारा व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने एक खाजगी किस्सा शेअर केला. नुकतीच अभिज्ञाची आई दुबईहून परतली आहे. त्यामुळे तिला एका बंद खोलित ठेवण्यात आले आहे. योग्य ते तपासणीही करण्यात आली असून यात तिला कोरोणाची लागण झाली नसल्याचेही सांगितले आहे. खबरदारी म्हणून सध्या तिच्या आईला सेल्फ क्वॉरंटाईन करण्यात आल्याचेही तिने सांगितले आहे.

मात्र यात अनेकांनी अभिज्ञालाही याची लागण होऊ शकते. त्यामुळे चिंता देखील व्यक्त केली आहे. अनेकांच्या मनात चुकीची भीती निर्माण झाल्यामुळे तिने लोकांना करोना आणि क्वॉरंटाईन यातला फरकही समजवला आहे.

कनिकाची कोरोना व्हायरसची तिसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह 

कनिका कपूरचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून कनिकाची आता तिसऱ्यांदा कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली आहे.कनिकाची कोरोना व्हायरसची तिसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली असून लखनऊमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डायरेक्टर आर.के. धिमान यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, कनिकाचे दोन रिपोर्ट जोपर्यंत निगेटिव्ह येत नाहीत, तोपर्यंत तिच्यावर उपचार सुरूच राहाणार आहेत.

टॅग्स :कनिका कपूरमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस