Join us  

कॉमेडीचा बादशाह अशोक सराफ ह्यांचा ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 5:03 PM

गेली 49 वर्ष आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ह्यांचा ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

ठळक मुद्देहृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला रिलीज होणार आहेअशोक सराफ या सिनेमात लव्हगुरूची भूमिका साकारणार आहे

गेली 49 वर्ष आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ह्यांचा ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाची निर्मिती विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांनी केली आहे. तर सचिन नथुराम संत ह्यांची सहनिर्मिती असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे ह्यांनी केले आहे.

सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात मराठी सिनेसृष्टीत अनेक सिनेमांतून रोमँटिक भूमिका केलेले अशोक सराफ हृदयात समथिंग समथिंग सिनेमात लव्हगुरूची भूमिका निभावताना दिसतील. अभिनेते अशोक सराफ सिनेमाविषयी सांगतात, “मी आजकाल निवडक सिनेमांमध्ये काम करतो. ह्या सिनेमाचे कथानक मला आवडले. हा सिनेमा मजेदार विनोदी चित्रपट आहे. आजकालच्या तरूण पिढीला आवडेल अशी ही कथा आहे. कोणत्याही शाब्दिक कोट्या, आंगिक विनोद न करता निखळ मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे.”

ते आपल्या भूमिकेविषयी सांगतात, “सिनेमात मी अनिकेत विश्वासरावचा बॉस आहे. अनिकेतला एक मुलगी खूप आवडत असते. तिला अनिकेतच्या प्रेमात पाडण्यासाठी मी त्याला नानाविध क्लृपत्या सांगत असतो. त्यामूळे मला लव्हगुरू म्हटलं गेलंय. ब-याच कालावधीनंतर निव्वळ आनंद देणारा आणि करमणूक करणारा असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सिनेमा पाहताना आयुष्यातल्या चिंताचा विसर पडून तुम्ही दोन घटका एन्जॉय करता. प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच हा सिनेमा आपलासा वाटेल. आणि तुम्ही आपल्या कुटूंबासोबत चित्रपटगृहात येऊन भरपूर हसून जाल, यात काही शंका नाही.”  

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला, सचिन संत ह्यांची सहनिर्मिती असलेला  प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :अशोक सराफ