Join us

सिंड्रेलाचे 'टपोरी' गाणे रिलीजहृदयाला भिडणार्‍या सिंड्रेलाच्या चित्रपटाच्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:23 IST

सिंड्रेलाचे 'टपोरी' गाणे रिलीजहृदयाला भिडणार्‍या सिंड्रेलाच्या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर त्यातील 'टपोरी' हे एक मजेशीर गाणे रिलीज करण्यात आले आहे. ...

सिंड्रेलाचे 'टपोरी' गाणे रिलीजहृदयाला भिडणार्‍या सिंड्रेलाच्या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर त्यातील 'टपोरी' हे एक मजेशीर गाणे रिलीज करण्यात आले आहे. प्रचंड उत्साहाने भरलेल्या स्टेप्स आणि हावभावांनी हे गाणं जिंकून घेत. संवेदनशील आणि सुंदर अशा लव्ह स्टोरी असलेला चित्रपट कृपासिंधू पिक्चर्स सादर करत असून, किरण नक्ती चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, अंजली जोशी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यामध्ये रूपेश बाने, यशस्वी वेंगुर्लेकर, मंगेश देसाई, विनीत भोंडे, जनार्दन परब, याकूब सय्यद व अथर्व नक्ती आदी कलाकार आहेत.