Join us  

असे काय झालं की, चाहते रिंकुला तुला फुल सपोर्ट असल्याचे सांगतायेत !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:45 AM

नेहमी प्रमाणे रिंकु राजगुरूने तिचा नवीन फोटो शेअर करताच भरभरून लाईक्स कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळते आहे.  फोटो शेअर करत तिने सुंदर अशी कॅप्शनही दिली आहे.

दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी रिंकु राजगुरू सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. नुकताच तिने  एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नेहमी प्रमाणे रिंकुने तिचा नवीन फोटो शेअर करताच भरभरून लाईक्स कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळते आहे.  फोटो शेअर करत तिने सुंदर अशी कॅप्शनही दिली आहे. ही कॅप्शन वाचून चाहते ''आमचा तुला सपोर्ट'' असल्याचे कमेंटद्वारे सागंत आहेत. 

फोटोतील अंदाज पाहून चाहते तिच्यावर पुन्हा एकदा फिदाच झाले आहेत. युजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आपले प्रेमही व्यक्त करत आहेत. तुर्तास हा फोटो रसिकांच्या चांगलाच पसंतीस पात्र ठरल्याचे पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनमध्येही इन्स्टाग्रामवर तिनं एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओत रिंकू चपाती करता दिसली. 'घरी राहा, सुरक्षित राहा. आईला घर कामात मदत करा, पुस्तके वाचा, चित्रपट बघा, चित्रे काढा, व्यायाम करा. काळजी घ्या’ असं तिनं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं

टॅग्स :रिंकू राजगुरू