बसस्टॉप चित्रपटाच शुटिंग पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 11:07 IST
मराठी इंडस्ट्रीच्या स्टार कलाकारांचा समावेश असलेला बसस्टॉप या चित्रपटाचं शुटिंग नुकतंच पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, पूजा ...
बसस्टॉप चित्रपटाच शुटिंग पूर्ण
मराठी इंडस्ट्रीच्या स्टार कलाकारांचा समावेश असलेला बसस्टॉप या चित्रपटाचं शुटिंग नुकतंच पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत, अमृता खानविलकर, सिध्दार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, अक्षय वाघमारे, रसिका सुनील, सुयोग गो-हे आणि मधुरा देशपांडे या स्टार कलाकारांचा समावेश आहे. यातील हे लाडके कलाकार पाहून नक्कीच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता मात्र सर्वानाच लागली आहे. पण या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख अजून गुलदस्त्यातच आहे. समीर दिग्दर्शित बसस्टॉप या चित्रपटाची निर्मिती श्रेयस जाधव, पूनम शेंडे, गजेंद्र पाटील यांनी केली आहे. नुकतेच या चित्रपटातील सर्व कलाकारांची धमाल करतानाचा फोटो बसस्टॉप चित्रपटाच्या सेटवर क्लिक करण्यात आला आहे. चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करतानाचा आनंद या किलकमध्ये कैद झाला आहे.