Join us

बिग बिं चा चॅम्पियन डिस्को सन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 12:34 IST

 Exculsive - बेनझीर जमादार                     बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ...

 Exculsive - बेनझीर जमादार                     बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूतनाथ रिटर्न्स  या  चित्रपटात पार्थ भालेराव या कलाकाराने रूपेरी पडदा गाजविला होता. तसेच त्याने राष्ट्रीय पुरस्कारावर  देखील आपले नाव कोरले आहे. महाराष्ट्राचा हा लाडका वंडर किड पार्थ भालेराव  डिस्को सन्या या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटविषयी  पार्थ भालेराव याने लोकमत सीएनएक्सशी साधलेला संवाद.  १. डिस्को सन्या या चित्रपटात तूझी भूमिका काय आहे?-  डिस्को सन्या या चित्रपटात पहिल्यांदा मी लीड रोलमध्ये झळकत असल्याने खूप आनंदी आहे. या चित्रपटात मी डिस्को सन्याची भूमिका साकारली  आहे. डिस्को सन्या हा झोपडपट्टीत राहणारा मुलगा आहे. पण परिस्थितीविषयी कधी ही खंत न व्यक्त करता तो आनंदाने आयुष्य जगत असतो. तसेच या ही परिस्थितीत तो खूप समजूतदार आहे. असा हा  खूप छान अनुभव या चित्रपटाच्या माध्यमातून मला मिळाला आहे. २. ही भूमिका तुला कशी मिळाली- पहिल्यांदा निर्माते अभिजीत व सचिन सर यांनी पटकथा ऐकविण्यासाठी बोलाविले होते. पण मी चित्रपट करण्यास नकार दिला होता. पण पुन्हा मला काही दिवसानंतर पटकथा ऐकविण्यात आली. त्यावेळी  मी खूप विचार केला. आणि ही भूमिका करण्यास होकार दिला. हा माझा निर्ण़य योग्य होता असे मला  वाटते. ३. भूतनाथ रिटर्न्स या चित्रपटातदेखील झोपटपट्टीमध्ये राहणाºया मुलाची भूमिका साकारली होती, आता पुन्हा त्याच प्रकारची भूमिका साकारत आहे याबद्दल काय सांगशील?- खरं तर डिस्को सन्या या चित्रपटातील भूमिका देखील झोपडपट्टीमधील राहणाºया मुलाची असल्याने या चित्रपटाला नकार दिला होता. कारण तो डार्क मेकअप, ते फाटके कपडे तिच भूमिका करायची नव्हती. त्यानंतर मी चित्रपटाचा विषय समजून घेतला. या चित्रपटाद्वारे एक एक चांगला संदेश मी लोकांर्पत पोहचवू शकतो अस वाटल्याने हा चित्रपट स्वीकारला. ४. सध्या तू बारावीत आहेस , मग अभ्यास आणि चित्रपट या दोन्ही गोष्टी कसे सांभाळतो?- डिस्को सन्या या चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले त्यावेळी मला सुट्टया होत्या. आता चित्रपटाचे प्रमोशन असल्याने अभ्यासाकडे थोडे दुर्लक्ष झाले आहे. पण परिक्षेच्या  शेवटच्या तीन महिन्यात अभ्यासावर लक्ष केद्रिंत करणार आहे. ५.  भूतनाथ रिटर्न्स या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? - बिग बींसोबत काम करण्याचे स्वप्न प्रत्येक कलाकाराचे असते. आणि हेच स्वप्न इतक्या लहान वयात पूर्ण झाल्याने मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. तसेच या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान ब्रेक मिळाला की, प्रॉडक्शनचे लोक बिग बींना आराम करा असे सांगायचे. त्यावेळी बिग बीं म्हणायचे, अभी आराम के दिन निकल चुके है, काम के दिन है. त्यांची ही वाक्य ऐकून खरंच खूप प्रोत्साहन मिळायचे. त्यांच्याकडून या चित्रपटाच्या दरम्यान खूप काही शिकण्यास  मिळाले.६. अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एखादा किस्सा ?- बिग बिंना भेटण्याच्या पूर्वी खूप भीती वाटत होती. मला वाटलं त्यांच्या मूडनुसार वागावे लागणार. पण ज्यावेळी  भेटून मी त्यांच्या पाया पडलो. त्यावेळी ते म्हणाले, पैर क्यू पड रहे हो, अब तो तुम मेरे पार्टनर हूँ त्यावेळी खरंच खूप आनंद झाला. ते मला सेटवर नेहमी चॅम्पियन म्हणायचे. त्यामुळे खूप भारी वाटायचे.७. तुझे काही आगामी चित्रपट? - मी नुकतेच फिरकी या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट दिवाळीपर्यत प्रदर्शित होणार आहे. तर सध्या रंगापतंगाचे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांच्यासोबत  म्युझिक पार्लर चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे.