भूषण आणि मृण्मयी पहिल्यांदाच एकत्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 12:06 IST
नेहमीच समान्य जीवनात किवा चित्रपटांच्या माध्यमातून अलिबागची खिल्ली उडवली जाते. या खिल्लीला उत्तर देण्यासाठी गुलमोहोर हा मराठी चित्रपट आता ...
भूषण आणि मृण्मयी पहिल्यांदाच एकत्रित
नेहमीच समान्य जीवनात किवा चित्रपटांच्या माध्यमातून अलिबागची खिल्ली उडवली जाते. या खिल्लीला उत्तर देण्यासाठी गुलमोहोर हा मराठी चित्रपट आता सज्ज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान आणि मृण्मयी देशपांडे एकत्रित पाहायला मिळणार आहे. अलिबागकर जगात कुठेच कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. हा वारसा चालत आलाय दर्यावर्दी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यापासून ते स्वतंत्र भारताचा अभिमान जनरल अरुण कुमार वैद्यपर्यंत. हाच सोनेरी वारसा आपण पुढे चालवला जाणार आहे गुलमोहोर या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून. होय, अलिबागचा पहिला मराठी चित्रपट गुलमोहोर हा आहे. तसेच या चित्रपटाचे प्रमोशनल गाणंदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक, गीतकार, अभिनेते, निमार्ते श्रीरंग गोडबोले यांनी पाहिला व अलिबाग मधील टॅलेंट पाहून ते थक्क झाले. त्यांनी अलिबागची धमक ओळखली आणि ठामपणे या चित्रपटाच्या मागे त्यांचा स्वत: चा सिनेमा असल्यासारखे उभे राहिले. या गीताचे गीतकारदेखील श्रीरंग गोडबोले हे आहेत. हेच अलिबागचे यश आहे.. अलिबागच्या मातीचा अभिमान जागवणारे आणि मना मनात अलिबागचा गर्व द्विगुणित करणारे गीत हा मैं अलिबागसे आया.. तसेच, या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेता भूषण प्रधान हे पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. प्रेक्षकांची ही लाडकी व हटके जोडी प्रेक्षकांना आता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकदेखील नक्कीच हा चित्रपट पाहाण्यास उत्सुक झाले असणार आहे. यापूर्वी भूषण हा प्रेक्षकांना अनेक मालिका व चित्रपटातून पाहायला मिळाला. तर मृण्मयीदेखील नटसम्राट, कटयार काळजात घुसली अशा अनेक चित्रपटातून झळकली आहे.