Join us  

भार्गवी चिरमुले झळकणार या वेबसिरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 9:03 AM

खमंग, चमचमीत, खुमासदार, चटपटीत, लज्जतदार हे शब्द कानावर पडले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहतच नाही. पण प्रश्न हा आहे ...

खमंग, चमचमीत, खुमासदार, चटपटीत, लज्जतदार हे शब्द कानावर पडले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहतच नाही. पण प्रश्न हा आहे की आपल्यासाठी हे पूर्णब्रम्ह बनवणार कोण? कूकिंग म्हटलं तर दोन हात लांबच असे अनेक मुलींना वाटत असते. तसेच मुलांना डब्यात काय द्यायचे या पेक्षा देखील मोठा प्रश्न म्हणजे उरलेल्या अन्नाचे काय करायचे? हा प्रश्न प्रत्येक घरातील गृहिणीला पडलेला असतो. असेच काही प्रश्न सोडवण्यासाठी आणि कमीत कमी वेळेत वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शिकवण्यासाठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले 'ट्रेंडी टेस्टी ट्रीट' या नावाने एक वेबसिरिज घेऊन आली आहे. कोणत्याही वेबसिरिजमध्ये काम करण्याची भार्गवीची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे ती या वेबसिरिजसाठी खूप उत्सुक आहे. ‘ट्रेंडी टेस्टी ट्रीट’चा पहिला प्रोमो नुकताच युट्यूबवर ट्रेंडी टेस्टी ट्रीटच्या चॅनेलवर लाँच करण्यात आला असून पहिला एपिसोड १० नोव्हेंबरला प्रसारित करण्यात आला. त्यात भार्गवीने प्रोमोमध्ये विचारलेला पहिला प्रश्न ‘कॅन मेन कूक?’चे उत्तर शेफ सचिन जोशी यांच्यासोबत शोधले. पहिल्या एपिसोड मध्ये शेफ सचिन जोशी यांनी ‘टोमॅटो ब्रूसचेता’ असा सोपा आणि सुंदर पदार्थ बनवला. सचिन जोशी गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सक्रिय आहेत आणि कार्निव्हल क्रूसलॅन्डस ही अमेरिकेतली नामांकित कंपनी आहे. त्यासाठी सचिन यांनी काम केलंय आणि सध्या पुण्यात मल्टी-कुसीन रेस्टॉरंट चालवत आहे. त्याचप्रमाणे ते हॉटेल मॅनेजमेंट फॅकल्टीसुद्धा आहेत.शेफ सोबत भार्गवी कूकिंग या विषयावरील अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमाच्या दरम्यान शोधणार आहे. भार्गवी सांगते, 'सध्याच्या करियर ओरिएंटेड जगात स्त्रियादेखील जेवण बनवण्यापासून दोन हात दूर राहतात. कूकिंग हा प्रत्येक व्यक्तिचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मी स्वतः त्यात खूप वाईट आहे. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खायला आवडतात. परंतु ते कसे बनवले जातात हे आपल्याला माहिती नसते. तसेच खाद्यात देखील फ्युजन हा प्रकार आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणणार आहोत आणि अगदी अवघड पदार्थ सोप्या पद्धतीने करून सांगणार आहोत.' Also Read : भार्गवी चिरमुलेची दुबई सफर