Join us  

'बाजीराव मस्तानी' सिनेमातल्या भिऊबाईचा मॉर्डन अंदाज तुम्हालाही थक्क करेल,तर आता इरफान खानला करणार ‘ब्लॅकमेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 10:07 AM

मराठी कलाकार मराठी मालिका आणि सिनेमात भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकत असतात. मात्र सध्या हे कलाकार मराठीसह हिंदी सिनेमा ...

मराठी कलाकार मराठी मालिका आणि सिनेमात भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकत असतात. मात्र सध्या हे कलाकार मराठीसह हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत आहेत. आपल्या अभिनयाने मराठी कलाकार वर्षानुवर्षे हिंदी रसिकांची मने जिंकत आहेत. या गोष्टीला आजची तरुण पीढीही अपवाद नाही. मराठी मोठा पडदा आणि छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री अनुजा साठे हिच्याबाबतसुद्धा ही बाब तंतोतंत लागू पडते.संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या सिनेमात भिऊबाई ही भूमिका अनुजाने साकारली होती. तिच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झालं.आता अनुजा आणखी एका हिंदी सिनेमात झळकत आहे.अभिनेता इरफान खानसह ती ब्लॅकमेल या सिनेमात स्क्रीन शेअर करणार आहे.या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो रसिकांना चांगलाच भावतो आहे. मराठमोळी अनुजा इरफानला ब्लॅकमेल करताना पाहायला मिळेल.बाजीराव मस्तानी सिनेमात पारंपरिक मराठमोळ्या वेशात दिसलेली अनुजा ब्लॅकमेल सिनेमात मॉर्डन अंदाजात दिसेल.तिचा या सिनेमातील शहरी लूकही रसिकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.अनुजा साठे ही मराठी अभिनेता सौरभ गोखले याची पत्नी आहे. सौरभ आणि अनुजा यांचा प्रेमविवाह झाला असून मांडला दोन घडींचा डाव या मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती.याच मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि मग दोघंही रेशीमगाठीत अडकले. आपल्या अभिनयाने अनुजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अग्निहोत्र, मांडला दोन घडीचा डाव,लगोरी मैत्री रिटर्न्स, विसावा,तमन्ना अशा मालिकांमध्ये ती झळकली होती. असा मी अशी ती, राखणदार, भोभो, कॉफी आणि बरंच काही, घंटा या सिनेमातही अनुजा झळकली आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इरफानने ट्विटरवर खुलासा केला होता की, तो एका भयंकर आजाराशी लढा देत आहे.वास्तविक आतापर्यंत त्याच्या आजारपणाबद्दलचा कुठलाही खुलासा समोर आलेला नाही. त्यामुळे सध्या सर्वत्र अफवा पसरविल्या जात आहेत.वाढत्या अफवा बघून इरफानची पत्नी सुतपा सिकदरने एक पोस्टच्या माध्यमातून लोकांना अफवा न पसरविण्याची विनंती केली आहे.फेसबुकवरील एका लांबलचक पोस्टमध्ये सुतपाने लिहिले की,‘इरफानला काय झाले हे जाणून घेण्यासाठी तुमच्यातील अनमोल ऊर्जा उगाचच वाया घालवू नका.माझा सर्वात चांगला मित्र आणि जोडीदार एक यौद्धा आहे. तो जबरदस्त अंदाजात या संकटाचा सामना करीत आहे. तुमच्या संदेशाचे अन् कॉलचे उत्तर न दिल्याबद्दल मी माफी मागते.परंतु मी जगभरातून इरफानच्या दीर्घायुष्यासाठी केली जात असलेली प्रार्थना, चिंता आणि शुभेच्छासाठी कायम ऋणी राहणार आहे.