Join us  

"'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर पतीचं निधन झालेल्या महिलेने...", केदार शिंदेंनी सांगितला 'तो' प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 3:01 PM

"तीन महिन्यांपूर्वी निधन झालेल्या महिलेने चित्रपट पाहिल्यानंतर...", केदार शिंदेंनी सांगितला अनुभव

'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. ठिकठिकाणी या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानचे थिएटरमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी सिनेमा पाहिल्यानंतर एका महिला प्रेक्षकाचा अनुभव शेअर केला आहे. 

'बाईपण भारी देवा' चित्रपटाच्या यशानंतर केदार शिंदेंनी एका युट्यूब चॅनेनला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या आलेल्या प्रतिक्रियांवर भाष्य केलं. ते म्हणाले, "चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया मला आली होती. त्या महिलेच्या पतीचं तीन महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. तेव्हापासून ती एकटी पडली होती. तेव्हापासून ती महिला हसली नव्हती. हा चित्रपट पाहिल्यानंतर ती महिला हसली, नाचली आणि तिला जगण्याची नवी उमेदही मिळाली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे."

दोन लग्नांनंतरही 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेले धर्मेंद्र, हेमा मालिनींना कळलं अन्...

"मी चित्रपट बनवताना त्यातून सामाजिक संदेश देईन, माझा चित्रपट खूप चांगला आहे, असा कोणताच अविर्भाव आणला नाही. माझा चित्रपट हा स्वयंपाकघरात पोहोचला पाहिजे, एवढाच माझा विचार होता. कोणताही चित्रपट स्वयंपाकघरात पोहोचला की तो यशस्वी होता. गंगाधर टिपरे मालिकाही स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली. त्यामुळे आजही ही मालिका लोकांना आवडते," असंही त्यांनी सांगितलं. 

"राज ठाकरे यारों का यार", अतुल परचुरेंचं वक्तव्य, म्हणाले, "त्याने एकदा फोन करुन..."

सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणारा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या १२ दिवसांत २६ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात सुकन्या मोने, रोहिणी हट्टांगडी, दीपा परब, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :मराठी चित्रपटकेदार शिंदेमराठी अभिनेता