Join us

​प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली... या दिवशी प्रदर्शित होणार माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 12:32 IST

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या ...

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित बकेट लिस्ट या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरला प्रेक्षकांची खूपच चांगला प्रतिसाद दिला असून माधुरीचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता आता तिच्या फॅन्सना लागली आहे. तिच्या चाहत्यांसाटी एक खूप चांगली बातमी आहे. कारण बकेट लिस्ट या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि या घोषणेसोबतच माधुरीच्या चाहत्यांना आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे. ती म्हणजे निर्माता- दिग्दर्शक करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेने मराठी चित्रपटसृष्टीत उडी घेतली असून माधुरी दीक्षितच्या आगामी बकेट लिस्ट या चित्रपटासोबत करणच्या धर्मा प्रॉडक्शन्सचे नावही जोडले गेले आहे. हा चित्रपट २५ मे ला प्रदर्शित होणार आहे. माधुरी दीक्षितने ट्वीट करत याविषयी तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. तिने या चित्रपटाचे एक नवे पोस्टर पोस्ट केले असून यामध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसत आहे. करण जोहरने देखील मराठीत ट्वीट करत बकेट लिस्ट या चित्रपटाबाबत सांगितले आहे. त्याने ट्वीटमध्ये माधुरीला टॅग करत आपण दोघही पूर्ण करुया आपली BucketList असे लिहिले आहे. बकेट लिस्ट या चित्रपटात ती पुण्यात राहाणाऱ्या एका स्त्रीची भूमिका साकारत आहे. पुण्यात राहाणाऱ्या लोकांची बोलण्याची ढब ही मुंबईतील लोकांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे माधुरीने ही ढब शिकली आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये माधुरी आपल्याला बाईक चालवताना दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी ती बाईक चालवायला सुद्धा शिकली आहे.ब्लू मस्टँग क्रिएशन्स, डार्क हॉर्स सिनेमा आणि दार मोशन पिक्चर्स निर्मित बकेट लिस्ट या सिनेमाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केले आहे तर चित्रपटाची कथा तेजस प्रभा विजय देऊसकर आणि देवश्री शिवाडेकर यांनी लिहिली आहे.  माधुरीसोबत वंदना गुप्ते, सुमीत राघवन, शुभा खोटे आणि रेणुका शहाणे या कलाकारांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. Also Read : माधुरी दीक्षितच्या बकेट लिस्ट या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला का?