आश्विनी भावेचे पुनरागमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 21:07 IST
सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपार्दिकर यांच्याशी लग्न केल्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री आश्विनी भावे आपला संसार थाटत अमेरिकेतील सॅन ...
आश्विनी भावेचे पुनरागमन
सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपार्दिकर यांच्याशी लग्न केल्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री आश्विनी भावे आपला संसार थाटत अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोत स्थायिक झाली. त्यामुळे आपण तिला कमी चित्रपटांमध्ये पाहिले आहे. ‘कळत नकळत’, ‘आहुती’ ‘सरकारनामा’, ‘वजीर’ आदी चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. लग्नानंतर ती पुन्हा चित्रपट सृष्टीत ‘ध्यानीमनी’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन करीत असून चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.