अशोक सराफ लवकरच या मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 15:11 IST
cnxoldfiles/a> या सिनेमात अशोक सराफ यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती.या सिनेमालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशोकमामा ...
अशोक सराफ लवकरच या मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार
cnxoldfiles/a> या सिनेमात अशोक सराफ यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती.या सिनेमालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशोकमामा आता कोणती वेगळी भूमिका साकारणार, त्यांचा कोणता नवा सिनेमा असणार अशी प्रतीक्षा करणारा रसिक आहे. याच रसिकांसाठी एक गुडन्यूज आहे. रसिकांचे लाडके अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहेत. एका आगामी मराठी सिनेमात ते भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाचं नाव 'हृदयात समथिंग समथिंग' असं आहे. या सिनेमात अशोक सराफ यांच्यासह आजच्या पीढीचा आणि तरुणाईचा लाडका अभिनेता अनिकेत विश्वासराव झळकणार आहे. सिनेमाच्या टीमसोबत अशोक सराफ आणि अनिकेत विश्वासराव यांचे काही फोटो समोर आले आहेत.या सिनेमात कोणती अभिनेत्री झळकणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सिनेमाच्या नायिकेचं नाव अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.पिरॅमिड फिल्म्स प्रॉडक्शन बॅनरखाली हा सिनेमा बनणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रविण कराळे करणार आहेत. नवीन श्रीराम यांचं संगीत या सिनेमाला लाभणार आहे. त्यामुळे लवकरच अशोकमामा आणि अनिकेत विश्वासराव यांचा धम्माल अंदाज रुपेरी पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे.