Join us  

'मुंबई-पुणे-मुंबई 3' सिनेमात असणार ही कलाकार मंडळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 12:32 PM

'मुंबई-पुणे-मुंबई 3' सिनेमा संपूर्ण राज्यात ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

ठळक मुद्दे'मुंबई पुणे मुंबई-3'मध्ये स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे'मुंबई पुणे मुंबई-3' ७ डिसेंबरला होणार प्रदर्शित

'मुंबई पुणे मुंबई-1' हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटाचा पुढचा भाग 'मुंबई पुणे मुंबई-2' दोन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता या सिनेमाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली (फ्रायडे सिनेमाज) आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे असून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही हिट जोडी या तिसऱ्या भागातही दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर मुक्ता बर्वे व स्वप्नील जोशी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात मुक्ता व स्वप्नील सह विजय केंकरे, प्रशांत दामले, सविता प्रभुणे व सुहास जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

मुक्ताने 'मुंबई पुणे मुंबई-3'चा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून लिहिले की,' आमचे सुपर 3 हिट परत येत आहे. पण, बॅण्डबाजा घेऊन नाही तर ट्याहा....ट्याहा... टप्प्याटप्प्याने उलगडत जाणाऱ्या गौतम-गौरीच्या सुपर 3 हिट प्रेमाचा तिसरा टप्पा...'

तिसरा प्रवासी दाखल होत आहे ७ डिसेंबरला... महाराष्ट्राची आवडती प्रेमकथा तिसऱ्या टप्प्यात आली. छोट्या पावलांची चाहूल लागली.दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात,''मुंबई पुणे मुंबई'ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. 'मुंबई पुणे मुंबई' हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची आता सवय लागून राहिली आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या घोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. 'मुंबई पुणे मुंबई'चे चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असे वाटले नव्हते. पण दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करत असताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवले होते. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काही बोलणे उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे.'मुंबई-पुणे-मुंबई 3' सिनेमा संपूर्ण राज्यात ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशीमुंबई पुणे मुंबई 3मुक्ता बर्वे