Join us  

लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा शेअर केला अपूर्वा नेमळेकरने नो मेकअप लूकमधील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 6:23 PM

तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे देशात 3 मे पर्यंत लोकडाऊन सुरु आहे. त्यामुळे सगळेच कलाकार सध्या आपल्या आपल्या घरी आहेत. सोशल मीडियावर सतत ते आपल्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. कुणी स्वयंपाक करतेय तर कुणी वाचन करतेय. रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. अपूर्वाने इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा तिचा नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत अपूर्वा नुकतीच उठून बेडवर बसलेली दिसतेय. आलाराम शिवाय झोप एक वेगळाच आनंद असतो असे कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

कॉलेजमध्ये असतानाच अपूर्वाला अ‍ॅक्टिंगच्या ऑफर येणे सुरु झाले होते. पण अपूर्वाने या सगळ्या ऑफर धुडकावल्या होत्या. याचे कारण म्हणजे, अभिनयात तिला कुठलाही रस नव्हता. खरे तर तिला एमबीए करायचे होते. पण अपूर्वाच्या आई-वडिलांची मात्र मुलीने अभिनयात जावे अशी इच्छा होती. नियतीने त्यांची ही इच्छा पूर्ण केली. कदाचित त्यामुळेच, अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते, असे अपूर्वा नेहमी म्हणते.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरझी मराठी