Join us  

या मराठी अभिनेत्री शेअर केला नो मेकअप लूकमधील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 11:34 AM

मराठीसोबतच या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दीपिका आणि प्रियंकासोबत काम केले आहे.

अभिनेत्री अनुजा साठेने मराठी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अग्निहोत्र, मांडला दोन घडीचा डाव यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले होते. तिने कॉफी आणि बरेच काही, राखणदार यांसारख्या मराठी चित्रपटातदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अनुजा साठेने आपल्या अभिनयानाची छाप पाडली आहे. अनुजा अभिनेता सौरभ गोखलेची पत्नी आहे.

अनुजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अनुजाचे सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात. अनुजाने नुकताच तिचा एक नो मेकअप लूकमधला फोटो शेअर केला आहे. मेकअप शिवाय काढलेल्या फोटोत ही अनुजा तितकीच सुंदर दिसते आहे. अनुजाचा नो मेकअप लूक ही तिच्या फॅन्सना आवडला आहे.  

अनुजाने संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजानं बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे.त्यानंतर ती 'परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमातदेखील दिसली होती. या दोन्ही सिनेमात अनुजाच्या वाट्याला महत्त्वाच्या भूमिका आल्या आहेत.

टॅग्स :अनुजा साठे