Join us  

राहुल देशपांडेच्या लाडक्या लेकीचा हा आणखी एक व्हिडीओ होतोय व्हायरल, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 4:17 PM

सोशल मीडियावर चिमुकलीचीच चर्चा

ठळक मुद्देराहुल यांच्या मुलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून काही व्हिडिओ तर लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत

सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे हे लोकप्रिय आहेतच. पण तूर्तास तरी त्यांची लाडकी लेक त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय झाली आहे. होय, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर याच चिमुकलीची चर्चा आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता तिचा आणखी एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. राहुल यांच्या मुलीचे नाव रेणुका आहे.रेणुका या व्हिडीओत एका शॅम्पूची जाहिरात करताना दिसतेय. होय, बाबा लाईट्स, कॅमेरा आणि अ‍ॅक्शन म्हणतो आणि चिमुकली रेणुका कॅमे-यापुढे अ‍ॅक्शन करू लागते. माझ्या सुंदर केसांचे रहस्य, वापरा आणि जादू पाहा, असे ती म्हणते. 

रेणुकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. आत्तापर्यंत सातशेवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून शेकडो लोकांनी तो शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी  सय्या मेरा... हे गाणे गातांनाचा तिचा एक क्यूट व्हिडीओ अलीकडे असाच व्हायरल झाला होता.   राहुल देशपांडे यांच्या फेसबुकच्या पेजवर सध्या रेणुकाचे एक ना अनेक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. गायक राहुल देशपांडे देखील त्यांच्या गायनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत असून काही व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांच्या चिमुकलीला देखील पाहायला मिळत आहे. या चिमुकलीचा व्हिडिओंमधील अंदाज राहुल यांच्या फॅन्सना प्रचंड आवडत असून तुमची मुलगी खूपच गोड असल्याचे लोक त्यांना कमेंटद्वारे सांगत आहेत.

राहुल यांच्या मुलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून काही व्हिडिओ तर लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत तर हजाराहून अधिक लोकांनी ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या कोणत्याही स्टार किड पेक्षा राहुल देशपांडे यांच्या मुलीचा सोशल मीडियावर बोलबाला आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.

टॅग्स :राहुल देशपांडे