Join us  

‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कारांची झाली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 5:32 PM

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे  व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे.

चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारे ‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी याची घोषणा व पुरस्काराची माहिती यावेळी दिली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे देण्यात येणारा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे  व निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ आणि ५१,०००/- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण मंत्री मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार १९ ऑगस्टला रविंद्र नाट्यमंदिर येथे सायंकाळी ६.०० वा. रंगणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येईल.

रमेश साळगांवकर, संजीव नाईक, विलास उजवणे, आप्पा वढावकर, नरेंद्र पंडीत, प्रशांत पाताडे, दिपक विरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे या कलाकर्मीना ‘चित्रकर्मी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि ११,००० /- रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका चैत्राली डोंगरे यांनी प्रास्ताविक केले तर संचालिका वर्षा उसगांवकर यांनी यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा यावेळी सांगितली. या कार्यक्रमासाठी उदयोन्मुख कलाकारांना यावेळी सादरीकरणाची संधी मंडळातर्फे देण्यात येणार आहे. प्रमुख कार्यवाहक सुशांत शेलार यांनी आभारप्रदर्शन केले. सहकार्यवाहक विजय खोचीकर, संचालक सतीश रणदिवे यावेळी उपस्थित होते.

चित्रभूषण  पुरस्कार  (पुरुष विभाग ) सन २०१५-२०१७

१) भालचंद्र कुलकर्णी - अभिनेता

२) श्रीकांत धोंगडे   -  कला - प्रसिद्धी

३) किशोर मिस्कीन  -  निर्माता

४) विक्रम गोखले   - अभिनेता / दिग्दर्शक

  

चित्रभूषण  पुरस्कार  (स्त्री विभाग ) सन २०१५-२०१७

१) श्रीमती लीला गांधी -  अभिनेत्री / नृत्यांगना

२) श्रीमती सुषमा शिरोमणी  - अभिनेत्री / निर्माती / दिग्दर्शिका / वितरक

  

चित्रकर्मी  पुरस्कार  विजेते सन २०१५-२०१७

१) रमेश साळगांवकर - दिग्दर्शक

२)  संजीव नाईक   -  संकलक / निर्माता / दिग्दर्शक

३)  विलास उजवणे  -  अभिनेता

४) आप्पा वढावकर  - संगीत संयोजक

५)  नरेंद्र पंडीत - नृत्य दिग्दर्शक

६) प्रशांत पाताडे  - ध्वनीरेखन

७) दिपक विरकूड + विलास रानडे - संकलक

८)  विनय मांडके  - गायक

९) जयवंत राऊत -  छायाचित्रण

१०) सतीश पुळेकर  -  अभिनेता

११) श्रीमती प्रेमाकिरण  - अभिनेत्री / निर्माती

१२) श्रीमती सविता मालपेकर - अभिनेत्री

१३) चेतन दळवी - अभिनेता

१४) अच्युत ठाकूर -  संगीतकार

१५) वसंत इंगळे - निर्मिती प्रबंधक / अभिनेता

 

टॅग्स :विक्रम गोखले