Join us  

'तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी', अंकुश चौधरीने अनोख्या अंदाजात लोकांना केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 1:24 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता अंकुश चौधरीने अनोख्या अंदाजात आपल्या चाहत्याना आवाहन केले आहे.

देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे अनेकांचा बळी देखील गेला आहे. कोरोनाचे संकट पाहता महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. दरम्यान अभिनेता अंकुश चौधरीने अनोख्या अंदाजात आपल्या चाहत्याना आवाहन केले आहे. 

अभिनेता अंकुश चौधरी याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. त्यात लिहिलंय की 'तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी..मी जबाबदार'. अंकुशच्या या पोस्टवर कमेंट्स येत आहे. या पोस्टवर अभिनेता स्वप्नील जोशी यानेदेखील कमेंट केली आहे. त्याने म्हटले की दिग्या बोलला... म्हणजे बोलला!. तसेच चाहते देखील दुनियादारीचा डायलॉग्सवर यमक जुळवत कोरोनाचा मेसेज बनवताना दिसत आहेत. 

अंकुश चौधरीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटचा तो धुराळा चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ हे कलाकार होते. त्यानंतर तो लकडाऊन या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगदेखील पूर्ण झाले आहे. 

मुंबईत बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. शुक्रवारी ३९२५ रुग्णांची नोंद झाली, तर त्याहून अधिक म्हणजे ६३८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत; परंतु एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात ८९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता १३ हजार १६१ झाला आहे. मात्र, रुग्णसंख्येत घट झाल्याने रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.७८ टक्के एवढा खाली आला आहे, तर ८७ दिवसांनी रुग्णसंख्या दुप्पट होत आहे.

टॅग्स :अंकुश चौधरीकोरोना वायरस बातम्या