Join us  

'आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर' चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 5:12 PM

मराठी कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास लवकरच 'आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातून उलगडणार आहे.

ठळक मुद्देडॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

मराठी कलाविश्वात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास लवकरच 'आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा दुसरा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

मराठी नाटक परंपरेत स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध करणारा कलाकार अशी डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची ओळख होती. मराठी नाटकांमध्ये कलाकाराने संवाद म्हटला की, त्याच्यावर शिट्टी वाजवण्याची सुरुवात घाणेकरांपासून झाली होती. स्वतःच्या नावावर नाटकाकडे गर्दी खेचून आणणारा अभिनेता, नाटकाच्या नामावलीत लोकप्रिय अभिनेत्याचे नाव सर्वात शेवटी ठेवण्याची परंपरा ज्यांच्यापासून सुरू झाली यावर दुसरा टीझर भाष्य करतो आहे. 

१९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे, त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमय रीत्या बदलून टाकला होता. वायकॉम18 मोशन पिक्चर्स, द स्टुडिओ बायोपिक्सच्या उल्लेखनीय सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे आणि मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी 'आणि...काशिनाथ घाणेकर' या सिनेमाद्वारे आता ते सज्ज आहेत  हे जबरदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारत आहे सगळ्यांचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे आता ते सज्ज आहेत. तसेच त्यांच्यासोबत सोनाली कुलकर्णी, सुमित राघवनदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे. प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जगणाऱ्या रंगभूमीच्या सम्राटाचे आयुष्य येत्या दिवाळीत म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी मोठया पडद्यावर उलगडणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

टॅग्स :सुबोध भावे काशिनाथ घाणेकर