Join us  

अमृता खानविलकर आता कोणत्या गाण्यावर थिरकणार?, या फोटोमुळे वाढली उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 7:15 AM

आपल्या अभिनयासह नृत्याने अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. उत्तम डान्सर असलेल्या अमृताच्या नृत्यावर रसिक फिदा आहेत.

वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमातही अमृताने काम केले आहे. 'गोलमाल', 'साडेमाडे तीन', 'नटरंग', 'झकास', 'धुसर', 'फक्त लढ म्हणा', 'सतरंगी रे', 'बाजी' अशा मराठी सिनेमात अमृताने काम केले आहे. 

आपल्या अभिनयासह नृत्याने अमृताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. उत्तम डान्सर असलेल्या अमृताच्या नृत्यावर रसिक फिदा आहेत. अमृताने डान्स रिअॅलिटी शोमध्येही आपल्या नृत्याची जादू दाखवली आहे. 'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोचे जेतेपद पटकावल्यानंतर तिच्या डान्सने साऱ्यांनाच वेड लावलं. त्यामुळे तिचा डान्स रुपेरी पडद्यावर पाहण्याची रसिकांना उत्सुकता असते. नुकतंच अभिनेत्री संध्या यांच्या गाजलेल्या लावणीवरही ती सिनेमात थिरकताना दिसली. लवकरच पुन्हा एकदा अमृता नवं नृत्य रसिकांसमोर घेऊन येणार आहे. 

नुकतंच तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमृता नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकरसह नृत्याचे धडे घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही तरी एक्सायटेड लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे अशी पोस्ट अमृताने शेअर केली आहे. त्यामुळे अमृताच्या या धमाकेदार नृत्याची रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल. 

बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगने आपल्या अभिनयाने व स्टाईल स्टेटमेंट रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. त्याचा चाहता वर्गदेखील खूप मोठा आहे. मात्र आता रणवीरने त्याला कोणती अभिनेत्री आवडते, हे सांगितले. तुम्हालाही ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल ना. रणवीरने दीपिका पादुकोणचे नाव न घेता चक्क एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव घेतले आहे. ही अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

अमृता खानविलकरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रणवीर तिच्याबद्दल बोलतो आहे. तो व्हिडिओत म्हणाला की, 'मनोरंजन विश्वातली माझी सर्वांत आवडती अभिनेत्री आहे अमृता खानविलकर असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :फुलवा खामकरअमृता खानविलकर