Join us  

अमृता खानविलकरचा फॅशनचा जलवा, पुरस्कार सोहळ्यात स्टाईल आणि ड्रेसने केलं घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 6:00 AM

नुकतंच ग्रेझियर मिलिनियेल अवॉर्ड्स सोहळ्यात अमृताचा हटके आणि स्टायलिश अवतार पाहायला मिळाला.

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने अमृताने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. नुकतंच ग्रेझियर मिलिनियेल अवॉर्ड्स सोहळ्यात अमृताचा हटके आणि स्टायलिश अवतार पाहायला मिळाला. या सोहळ्यात अमृताने ऑफ-शोल्डर वन पीस परिधान केला होता. शिवाय या ड्रेसला साजेसं अॅक्सेसरीज तिने परिधान केल्या होत्या. या ड्रेसमध्ये अमृताच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच होत्या. या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.  मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे.

 

याशिवाय हिंदी सिनेमातही अमृताने आपल्या अभिनयाने छाप पाडली. राजी, सत्यमेव जयते अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. मराठीत अमृताने अर्जुन, कट्यार काळजात घुसली, वेलकम जिंदगी, आयना का बायना अशा विविध सिनेमात काम केले आहे.

लवकरच अमृता 'पॉन्डेचेरी' या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यांत अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

टॅग्स :अमृता खानविलकर