Join us  

ओळखलंत का या अभिनेत्रीला? छोट्या पडद्यावरील आहे ही मिसेस मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 5:31 PM

तिच्या फॅन्सनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद मिळते आहे. या मालिकेतील समर पाटील व खानावळीची मालकीण सुमी यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे रिअल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे. 

अमृता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ते फॅन्ससोबत शेअर करत असते. अमृताने इन्स्टाग्रामवर तिचे व्हाईट गाऊनमधले फोटोशूट शेअर केले आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. तिच्या फॅन्सनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

अमृताने या मालिकेत काम करण्यापूर्वी ‘मिथुन’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याआधी लहान मोठी कामं केली होती. परंतु खरी ओळख मला ‘मिथुन’ या चित्रपटातून मिळाली. अमृता मिसेस मुख्यमंत्री मालिकेमुळे घराघरात पोहोचली. मुळची कोल्हापूरची असलेल्या अमृताचं शिक्षण पुण्यात झालं आहे.

या मालिकेत भूमिका मिळालेल्या संधीबद्दल एका मुलाखतीत तिने सांगितलं की, हा चित्रपट केल्यानंतर सर्व लक्ष पदवीच्या अभ्यासावर केंद्रित केलं होतं. त्यामुळे त्या काळात फार काम केलं नाही. परीक्षा झाल्यानंतर ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली. खरं तर छोट्या पडद्यावर काम करण्याचा मी कधी विचार केला नव्हता. मात्र मालिकांत काम करण्याचा अनुभव घेऊन पाहू, असा विचार करून मी ऑडिशन दिली होती. त्यात माझी निवड झाली आणि मालिका मिळाली.

टॅग्स :अमृता धोंगडेझी मराठी