Join us  

अमृता खानविलकरने शेअर केला ग्लॅमरस फोटो, यूजर्स म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 3:41 PM

अमृता खानविलकरने सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. 'राजी', 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. अमृता खानविलकर  मलंग या बहुचर्चित सिनेमात देखील दिसली  आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा आहे.

अमृता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते. अमृताने एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती खूपच बोल्ड आणि हॉट दिसतेय. पांढऱ्या रंगाच्या वनपीसवर अमृताने शर्ट परिधान केले आहे. अमृताच्या या फोटोवर नाईस, क्युट, ब्युटिफुल अशा कमेंट्स दिल्या आहेत. 

  अमृताचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. 

नुकतीच अमृता 'चोरीचा मामला' या सिनेमात दिसली होती तसेच लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल.

टॅग्स :अमृता खानविलकर