Join us  

'या' लिस्टमध्ये सामील होणारी अमृता खानविलकर ठरली पहिली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 5:17 AM

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या राजी चित्रपटाने बॉलिवूडच्या ‘100 कोटींच्या क्लब’मध्ये एंट्री घेतली आहे. ह्या चित्रपटामुळे 100 कोटींच्या ...

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या राजी चित्रपटाने बॉलिवूडच्या ‘100 कोटींच्या क्लब’मध्ये एंट्री घेतली आहे. ह्या चित्रपटामुळे 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेल्या पहिल्या मराठी अभिनेत्री होण्याचा मान अमृता खानविलकरने मिळवला आहे.मराठी फिल्म इंडस्ट्रीकडून सध्या अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सिनेसृष्टीतल्या एका जाणकाराने अमृताच्या ह्या यशाचं कौतुक करताना म्हटलंय की, मराठी सिनेसृष्टीत नाव कमवून आपल्या बॉलिवूड करियरच्या सुरूवातीच्या काळातच चित्रपटाला मिळालेलं हे घवघवीत यश अमृतासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरेल. बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत माधुरी दीक्षित या मराठी  आडनाव असणाऱ्या अभिनेत्रीने 100 कोटींच्या कल्बचा पल्ला गाठला आहे. पण माधुरीची गणना बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये होते.  त्यामुळे अमृता खानविलकर 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेली पहिली मराठी अभिेनेत्री ठरली आहे.‘राजी’ला मिळालेल्या यशानंतर अमृता खानविलकर प्रतिक्रिया देताना म्हणाली, “सध्या माझा आनंद गगनात मावत नाही आहे. करण (जोहर), मेघना(गुलजार), आलिया भट्ट विकी कौशल्य आणि युनिटमधल्या प्रत्येकाचीच मेहनत फळाला आलीय, असं मला वाटतं. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रेमासाठी मी त्यांची ऋणी राहुन.”राजीमध्ये आलियाने सहमत नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. सहमतचे वडील तिचे लग्न पाकिस्तानच्या एका अधिका-याची लावून देतात. तेथे  राहून सहमतला भारतासाठी हेरगिरी करता येईल, एवढाच या लग्नाचा उद्देश असतो. आलियाचे अनेक रूप या चित्रपटात पाहायला मिळताहेत. एक आज्ञाधारी मुलगी, भारताची एक शूर कन्या , एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि एक नीडर गुप्तहेर अशा विविधांगी भूमिकेत ती दिसतेयं. मेघनाचा हा चित्रपट हरिंद सिक्का यांच्या 'कॉलिंग सहमत' या कादंबरीवर आधारित आहे. या अमृताने आलियाच्या जावेची भूमिका साकारली आहे.