Join us  

अखेर प्रतिक्षा संपली, स्वप्नील जोशीची 'समांतर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा Trailer

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 7:00 AM

स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरीज प्रचंड हिट ठरली. 'समांतर'ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेल्या समांतरच्या पहिल्या भागाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

आजच्या तरुणाईचा मराठमोळा लाडका अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. आपल्या विविधरंगी भूमिका आणि अनोख्या स्टाईलनं स्वप्नीलनं तरुणाच्या मनात अढळ स्थान मिळवलंय. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरही स्वप्नीलनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. यानंतर डिजीटल प्लॅटफॉर्मवरही दमदार एंट्री करत त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरीज प्रचंड हिट ठरली. 'समांतर'ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेल्या समांतरच्या पहिल्या भागाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.  सिझन १ मध्ये स्वप्नील जोशीने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती. 

जिथे कुमारचे भविष्य स्पष्ट दिसत होते. त्यामुळे साहजिकच समीर विध्वंस दिग्दर्शित 'समांतर २' ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती, ती यात आता पुढे काय पाहायला मिळणार याची. ही उत्सुकता अधिक न ताणता एमएक्स प्लेअरने 'समांतर २'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. 

'समांतर'च्या पहिल्या सिझनमध्ये बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली तेजस्विनी पुन्हा एकदा 'समांतर 2' मध्ये बोल्ड अंदाजात दिसून येणार आहे.'समांतर 2' मध्ये स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत झळकणार असून त्या दोघांचे बोल्ड सीन या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहेत.दोन व्यक्ती, एका आयुष्यात दोन वेगळ्या काळात सारख्याच नशिबाचा सामना करत आहेत. चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचा भविष्यकाळ ठरवू शकेल? हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी मराठी एमएक्स ओरिजिनल 'समांतर २'चा ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :स्वप्निल जोशीतेजस्विनी पंडित