Join us  

बोस्टनमध्ये भेटली अमेय वाघला नवी मैत्रीण, पाहा तिचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 9:00 PM

बोस्टनमध्ये अमेयला एक नवी मैत्रीण भेटली आहे आणि अमेयनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्याच्या फॅन्सना सांगितली आहे. त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याच्या या नव्या मैत्रिणीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे.

ठळक मुद्देही मैत्रीण दुसरी कोणीही नसून एक क्यूट कुत्री आहे. त्याने या फोटोसोबत एक छान कॅप्शन लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तिला कळलंय हा वाघ harmless आहे आणि मला पण कळलं ती खूप प्रेमळ आहे!

मराठी सिनेमा, छोटा पडदा, रंगभूमी, वेबसिरीज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. आपल्या अभिनयाने अमेयने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही त्याची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. सध्या तो अमर फोटो स्टुडिओ या त्याच्या नाटकाच्या प्रयोगासाठी बोस्टनमध्ये आहे. 

बोस्टनमध्ये अमेयला एक नवी मैत्रीण भेटली आहे आणि अमेयनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्याच्या फॅन्सना सांगितली आहे. त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्याच्या या नव्या मैत्रिणीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. ही मैत्रीण दुसरी कोणीही नसून एक क्यूट कुत्री आहे. त्याने या फोटोसोबत एक छान कॅप्शन लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तिला कळलंय हा वाघ harmless आहे आणि मला पण कळलं ती खूप प्रेमळ आहे! भेटा बोस्टनमधील माझ्या नव्या मैत्रिणीला... अमेयची ही नवी मैत्रीण त्याच्या फॅन्सना देखील खूपच आवडली आहे. अमेय तुझी ही नवीन फ्रेंड् खूपच गोड आहे असे अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून त्याला सांगितले आहे. 

‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक रंगभूमीवर नाट्य रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेलं नाटक आहे. या नाटकाला सगळ्याच वयोगटातील लोकांची पसंती मिळत आहे. तरुणाईला भावणाऱ्या या नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत. अमेय वाघ, सुव्रत जोशी, सिद्धेश पूरकर, पर्ण पेठे आणि पूजा ठोंबरे अशी तगडी स्टारकास्ट या नाटकातून रसिकांचं मनोरंजन करत आहे. या नाटकात सखी गोखले महत्त्वाची भूमिका बजावत होती. पण सखी पुढील शिक्षणासाठी लंडनला गेली असल्याने तिला या नाटकाला रामराम ठोकावा लागला. नाटकातून एक्झिट घेत असले तरी हे नाटक नावाप्रमाणे ‘अमर’ राहणार आहे असं सखीने त्यावेळी म्हटले होते. या नाटकातून नाइलाजाने बाहेर पडत असले तरी हे नाटक सुरू रहावं अशी इच्छा तिने हे नाटक सोडताना व्यक्त केली होती. 

कलाकारखाना प्रस्तुत आणि सुबक निर्मित अमर फोटो स्टुडियो या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारीने केले आहे आणि या नाटकाच्या लेखिका मनस्विनी लता रविंद्र आहेत.

टॅग्स :अमेय वाघ