Join us

​अमेय म्हणतोय, होस्ट नाही तर दोस्त बनणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 12:36 IST

    priyanka londheअमेय वाघ प्रेक्षकांना नेहमीच वेगळ््या अंदाजात दिसत आला आहे. मालिका, चित्रपट, नाटक, वेब सिरीज या ...

    priyanka londheअमेय वाघ प्रेक्षकांना नेहमीच वेगळ््या अंदाजात दिसत आला आहे. मालिका, चित्रपट, नाटक, वेब सिरीज या सर्वच माध्यामातून अमेयने स्वत:च्या अभिनयाची अनोखी छाप रसिक प्रेक्षकाच्या मनावर उमटविली आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील कैवल्यवर प्रेम करणारा प्रेक्षकवर्ग आजही आपल्याला पाहायला मिळेल. मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय कमी वेळात स्वत:चे अस्तित्व निर्माण करणारा अमेय आता पुन्हा एकदा वेगळ््या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. बरं आम्ही काही अमेयच्या चित्रपटातील भूमिके विषयी बोलत नाही. तर तो आता एका डान्स रिअ‍ॅलिटी शोचे सुत्रसंचालन करताना आपल्याला लवकरच दिसणार आहे. होय, या गोष्टीचा खुलासा नुकताच अमेयने केला आहे. अमेय सांगतोय, मी सुत्रसंचालकाच्या भूमिकेत मॅड २ या शोमध्ये दिसणार आहे. मला सुत्रसंचालन करायला आवडत असल्याने मी लगेचच या शोसाठी होकार दिला. या शो मध्ये तरुण डान्सर येणार आहेत. त्या तडफदार मुलांसोबत हा शो करताना नक्कीच मज्जा येणार आहे. मला सतत नवीन लोकांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला, ट्युनिंग जमवायला फारच आवडते. या शो मध्ये देखील या सर्व स्पर्धकांशी मी एक सुत्रसंचालक म्हणुन नाही तर त्यांचा मित्र म्हणुन राहण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्यात राहून त्या सर्वांना मी सपोर्ट करणार आहे. माझ्यासाठी हा शो म्हणजे एक वेगळा अनुभव असणार आहे. त्यामुळे मी या शोसाठी खुपच एक्सायटेड असल्याचे अमेयने लोकमत सीएनएक्सशी दिलखुलास गप्पा मारताना सांगितले. तसेच या शो मध्ये अमेय आपल्याला एका वेगळ््या लुकमध्ये देखील दिसणार असल्याचे समजतेय.