Join us  

शुध्द देसी मराठीच्या नवीन वेबसिरीज फोमोचे सर्व एपिसोड झाले रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 9:12 AM

फोमो या नव्याकोऱ्या वेबसिरीजच्या पहिल्या,दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाला मिळालेल्या उत्सफूर्त प्रतिसादानंतर आज या सिरीजचे पुढचे तीनही भाग एकत्र रिलीज झाले आहेत.

शुध्द देसी स्टुडिओची निर्मिती असलेल्या स्त्रिलिंग पुल्लिंग या पुरस्कारप्राप्त मराठी बेव सिरीजच्या नंतर फोमो या नव्याकोऱ्या वेबसिरीजच्या पहिल्या,दुसऱ्या आणि तिसऱ्या भागाला मिळालेल्या उत्सफूर्त प्रतिसादानंतर आज या सिरीजचे पुढचे तीनही भाग एकत्र रिलीज झाले आहेत. याआधी मराठीतील पहिली वेबसिरीज स्त्रिलिंग पुल्लिंग जानेवारी २०१९ मध्ये लाँच करण्यात आली. तेव्हापासून शुध्द देसी मराठीचे २ लाख २० हजार सबस्क्राईबर झाले असून या चॅनेलला दीड कोटीच्या वर व्हीयूज मिळाले आहेत. त्यामुळे सध्याच्या डिजीटल युगात शुध्द देसी मराठी हे वेगाने लोकांमध्ये लोकप्रिय होणारे डिजीटल चॅनेल बनले आहे.तसेच पुरस्कार विजेती मराठी मूळ वेबसिरीज स्त्रिलिंग पुल्लिंग ३ जानेवारी २०१९ ला शुध्द देसी मराठी या यूट्यूब चॅनेलवरून प्रसिद्ध झाली होती. ६ भागांच्या या वेबसिरीजला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

इतकंच नाही तर गेल्या १० महिन्यात तब्बल १०.४ दक्षलक्षांहून जास्त व्हीयूज या वेबसिरीजला मिळाले आहेत. सर्वात मानाची गोष्ट म्हणजे स्त्रिलिंग पुल्लिंग या वेबसिरीजने मोस्ट पॉप्युलर वेबसिरीज या गटात ईटी ब्रँड इक्विटी स्पॉट पुरस्कार २०१९ हा मानाचा पुरस्कारही जिंकला आहे. शुध्द देसी मराठीच्या फोमो या वेबसिरीजच्या ६ भागांतील पहिला भागाला रसिकांनी दणदणीत प्रतिसाद दिला. फोमो- गर्दीतले दर्दी या विनोदी वेबसिरीजची निर्मिती शुध्द देसी स्टुडिओजने केली असून सुशांत धारवाडकर आणि चिन्मय कुलकर्णी यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. हे या दोघांचं दिग्दर्शनातील हे पदार्पण आहे. एका लहान गावातून मोठ्या शहरात येणाऱ्या आणि या मोठ्या शहरात त्याला सामावून घेण्यासाठी चाललेली धडपड ही फोमोची मूळ कल्पना आहे. समीर (अभिषेक देशमुख) मुंबईत एका रेडिओ चॅनलसाठी काम करतो. रेडिओ स्टेशनवर २ वर्षांहून अधिक काळ काम करूनही, ऑफिसमधील कोणीही त्याला खरोखर ओळखत नाही हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा हे फोमोचं संकट त्याच्या मानगुटीवर बसतं. ह्या फोमोतुन सुटका करून घेण्यासाठी तो जंग जंग पछाडतो. मात्र कितीही केलं तरी ही फोमोची भावना त्याची पाठ सोडत नाही.जेव्हा अशाच फोमोमुळे त्रस्त असलेल्या रेवती (पर्ण पेठे) शी त्याची ओळख होते. तेव्हा कुठे गोष्टी बदलायला लागतात. ते त्यांच्या परिस्थितीबद्दल काहीतरी करण्याचा निर्णय घेतात आणि कथेला एक आनंददायक वळण घेते. फोमो हे आधुनिक काळातील एक नाटक आहे ज्यात आपण लहान शहरांतून येणाऱ्यांशी कसे वागतो. मग त्यांचं काय होतं आणि त्यांना या त्रासाला कसं तोंड द्यावं लागतं यावर भाष्य करण्याचा या वेबसिरीजमधून प्रयत्न करण्यात आला आहे .

मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतील पर्ण पेठे आणि अभिषेक देशमुख ह्या जोडीने या बेवसिरीजमध्ये प्रमुख भूमिका रंगवली आहे. त्याचबरोबर रूचिता जाधव, चेतन चिटणीस,अक्षय जोशी हे मराठी सिने आणि टीव्ही विश्वातील लोकप्रिय कलाकार फोमो या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर मराठी सिने आणि टीव्ही क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय कलाकार सागर कारंडेही आरजेच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेत आपल्याला या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळतोय. तेव्हा ५ नोव्हेंबरला लाँच झालेल्या फोमो या पॉप्युलर वेबसिरीजच्या  सर्व एपिसोडचा तुम्ही नक्कीच आस्वाद घ्या. यातील खाली दिलेल्या लिंकवर जाऊन शुध्द देसी स्टुडिओची निर्मिती असलेल्या शुध्द देसी मराठी या युट्यूब चॅनेलवर अनुभवा .अतिशय आगळीवेगळी वेबसिरीज फोमो ....

टॅग्स :वेबसीरिजफोमो