Join us  

दोन मुली झाल्या म्हणून दुःखी झाल्या होत्या अलका कुबल, आज त्याच मुली अभिमान वाटावा करतायेत असे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:28 AM

रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा व्यक्तीरेखा साकारणा-या अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्या भूमिकेने रसिकांची मनं जिंकलीत.

खरं तर अभिनेत्री अलका कुबल यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये.अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा व्यक्तीरेखा साकारणा-या अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्या भूमिकेने रसिकांची मनं जिंकलीत. एक्टिंगपासून ते निर्मितीपर्यंत अलका कुबल यांनी आज आपला ठसा उमटवला आहे. 

 

वैविध्यपूर्ण आव्हानात्मक भूमिका आणि सिनेमातून करियरच्या सुरुवातीलाच सा-याचं लक्ष वेधून घेणा-या अलका कुबल यांच्यावर आजही रसिक तितकेच प्रेम करतात. 'माहेरची साडी' या चित्रपटामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली.अलका कुबल यांचे पती समीर आठल्ये हे फिल्म इंडस्ट्रीतील एक दिग्गज सिनेमेटोग्राफर म्हणून ओळखले जातात. अलका आणि समीर यांनी प्रेमविवाह केला. अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना इशानी आणि कस्तुरी या दोन लेकी आहेत.

 अलका कुबल यांच्या लग्न झाले तो काळ फार वेगळा होता. त्याकाळात स्त्रीने मुलाला जन्म देणे फार मोठी गोष्टी मानली जायची. मात्र अलका कुबल यांना दोन्हीही मुली झाल्याने त्या फार दुःखी होत्या. आजवर अनेक सेलिब्रिटी मुलांनी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्याची मराठी सिनेसृष्टीतही अनेक उदाहरणं आहेत.मात्र इशानी आणि कस्तुरी या दोघी आई- वडिलांना अभिमान वाटावा असे काम करतायेत. आई- वडिलांप्रमाणे मुलींनी अभिनय क्षेत्रात काम न करता करिअरसाठी वेगळेच क्षेत्र निवडले. 

मुळात इशानीला लहानपणापासूनच वैमानिक व्हायचे स्वप्न होते. ती आपल्या ध्येयावर ठाम होती. जिद्द आणि मेहनतीमुळे तिने आपल्या करिअरचा वेगळा मार्ग निवडत काहीतरी वेगळे काम करत स्वतःला सिद्ध केले.

 

इशानीने तिच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. इशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळालं आहे. दिल्लीतला निशांत वालियासोबत तिचे लग्न झाले आहे.दुसरी मुलगी कस्तुरीन देखील परदेशात डरमॅटोलॉजिस्टचे शिक्षण घेत आहे.

टॅग्स :अलका कुबल